क्रांतिज्याेती सावित्रीबाई फुले जयंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:50 AM2021-01-08T05:50:53+5:302021-01-08T05:50:53+5:30
क्रांतिज्याेती सावित्रीबाई फुलेंनी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ राेवत पहिली मुलींची शाळा सुरू केली. समाजातील अनिष्ट चालीरीती, कुप्रथांविराेधात आवाज उठवत त्या ...
क्रांतिज्याेती सावित्रीबाई फुलेंनी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ राेवत पहिली मुलींची शाळा सुरू केली. समाजातील अनिष्ट चालीरीती, कुप्रथांविराेधात आवाज उठवत त्या बंद केल्या. साेबतच महात्मा फुलेंच्या सत्यशाेधक समाज चळवळीत माेलाचे याेगदान देत खांद्याला खांदा लावून समाज घडविण्याचे कार्य केले. त्यांची प्रेरणा घेऊन चिखली तालुक्यातील पळसखेड सपकाळ येथील आरती व डाॅ. नंदकिशाेर पालवे दाम्पत्याने समाजातील उपेक्षित बेसहारा, मनाेरुग्णांसाठी सेवा संकल्प सुरू केले. या उच्चशिक्षित दाम्पत्याने समाजसेवा कार्यात स्वत:ला वाहून घेतले. त्यांच्या या कार्यास सलाम, असे प्रतिपादन सत्कारप्रसंगी प्रदेश सचिव राम डहाकेंनी केले. तर त्यांच्या या कार्याचा गाैरव म्हणून सावित्रीमाईंच्या जयंतीदिनी हा सन्मान सत्कार आहे. समाजातील तरुणांनी यापासून प्रेरणा घ्यावी, असे समाधान सुपेकर यांनी सांगितले. या वेळी रवी तरळकर, आशिष राऊत, गणेश वानखेडे, किरण राजपूत, राहुल वानखेडे आदींची उपस्थिती हाेती.