मजूर घेऊन जाणारा ट्रॅक्टर उलटला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 12:25 AM2017-08-19T00:25:07+5:302017-08-19T00:26:02+5:30
खामगाव : शेतातील मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर उलटून १३ जण जखमी झाले. यामध्ये ११ महिला आणि दोन बालकांचा समावेश आहे. ही घटना शुक्रवारी सायंकाळी ६.३0 वाजता दरम्यान, खामगाव- शेगाव रोडवरील लासुरा फाट्यावर घडली. जखमींपैकी चार महिला गंभीर असल्याने, त्यांना अकोला येथे हलविण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क

गायगाव शेतशिवारात गोविंदा लाहुडकार यांची शेती आहे. या शे तातील मुगाच्या तोडणीसाठी शेगाव तालुक्यातील खेर्डा गोसावी येथील महिला मजूर ट्रॅक्टरने गेल्या होत्या.
मूग तोडणीचे काम आटोपल्यानंतर घरी परतत असताना, लासुरा फाट्यानजीक ट्रॅक्टर उलटून झालेल्या अपघातात जिजाबाई आ त्माराम भेंगे(५0), इंदूबाई रामचंद्र बिंगेवार (३५), विमल विठ्ठल साठे (४५), संगीता गणेश गुल्लेवार (२0), बैनाबाई दादाराव नाईक (४0), लक्ष्मी पुंजाजी गावंडे (३५), रुख्माबाई महादेव उंबरकार (४0), शोभा समाधान भिसे (५0), कविता संतोष धामणकार (५0), शांताबाई वसंता धामणकार (६५), उषाबाई अरूण बिल्लेवार (३५), अंश गणेश बिल्लेवार (३), विशाल गणेश बिल्लेवार (६) जखमी झाले. जखमींना खामगाव येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. यामध्ये इंदूबाई बिंगेवार, बैनाबाई नाईक, लक्ष्मीबाई गावंडे, शांताबाई धामणकर गंभीर जखमी झाल्याने, प्रथमोपचारानंतर त्यांना अकोला येथे हलविण्यात आले. प्राप्त माहितीनुसार, शेषराव किसन येरळीकर यांच्या मालकीचा हा ट्रॅक्टर असून, विठ्ठल चोखट नामक चालक हा ट्रॅक्टर चालवित होता. अपघाताची माहिती मिळताच, खेर्डा गोसावी येथील नागरिक मोठय़ा संख्येने खामगाव येथील उप- जिल्हा रुग्णालयात दाखल झाले.