मजुरांच्या पाल्यांना हंगामी वसतिगृहाचा आधार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2018 12:41 AM2018-03-06T00:41:50+5:302018-03-06T00:41:50+5:30

लोणार : गावात हाताला काम नसल्याने पुणे, औरंगाबाद, मुंबईसारख्या महानगराच्या ठिकाणी मजुरी करण्यासाठी तालुक्यातील गोत्रा, टिटवी, खुरमपूर गावातील हजारो मजूर गेले आहेत. त्यांच्या मुलांचे शिक्षण थांबू नये, मुलांचे स्थलांतर रोखून त्यांच्या जेवणाची सोय व्हावी, यासाठी गटशिक्षणाधिकारी एस.आर.चव्हाण यांनी  १ मार्चपासून गोत्रा, टिटवी व खुरमपूर येथे हंगामी वसतिगृह सुरु केले आहे. मजुरांच्या पाल्यांना या हंगामी वसतिगृहाचा आधार मिळत आहे. 

Labor's child base of residential hostel! | मजुरांच्या पाल्यांना हंगामी वसतिगृहाचा आधार!

मजुरांच्या पाल्यांना हंगामी वसतिगृहाचा आधार!

googlenewsNext
ठळक मुद्देलोणार तालुक्यात हंगामी वसतिगृह सुरू हजारो मजुरांचे कामासाठी स्थलांतरण 

किशोर मापारी । 
लोकमत न्यूज नेटवर्क
लोणार : गावात हाताला काम नसल्याने पुणे, औरंगाबाद, मुंबईसारख्या महानगराच्या ठिकाणी मजुरी करण्यासाठी तालुक्यातील गोत्रा, टिटवी, खुरमपूर गावातील हजारो मजूर गेले आहेत. त्यांच्या मुलांचे शिक्षण थांबू नये, मुलांचे स्थलांतर रोखून त्यांच्या जेवणाची सोय व्हावी, यासाठी गटशिक्षणाधिकारी एस.आर.चव्हाण यांनी  १ मार्चपासून गोत्रा, टिटवी व खुरमपूर येथे हंगामी वसतिगृह सुरु केले आहे. मजुरांच्या पाल्यांना या हंगामी वसतिगृहाचा आधार मिळत आहे. 
लोणार तालुक्यात गेल्या चार वर्षांपासून पर्जन्यमान कमी झालेले आहे, तसेच तालुक्याला दरवर्षी नैसर्गिक आपत्तीचा फटका बसत असल्यामुळे आणि शासन स्तरावर गावात रोजगार उपलब्ध होत नसल्यामुळे पुणे, औरंगाबाद, मुंबई या ठिकाणी हजारो मजूर जातात. माय-बाप घर संसाराचा गाडा हाकण्यासाठी बाहेर गावी असल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा प्रकार गटशिक्षणाधिकारी एस.आर. चव्हाण यांच्या निदर्शनास आला.  गावात कोणी सांभाळ करण्यास  नसल्यामुळे अनेक विद्यार्थी बाहेरगावी जात असल्यामुळे त्यांचे भवितव्य धोक्यात येऊ नये, यासाठी गटशिक्षणाधिकाºयांनी  केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक, शाळा समिती यांच्या बैठका घेऊन विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी तालुक्यातील टिटवी, गोत्रा, खुरमपूर याठिकाणी हंगामी वसतिगृह सुरु करण्याचा निर्णय घेतला. याबाबत गोदावरी कोकाटे यांनी शासन दरबारी पाठपुरावा केला असून, गटशिक्षणाधिकाºयांच्या प्रयत्नांमुळे १ मार्चपासून दोन वेळेच्या जेवणाची सोय झाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहºयावर आनंद दिसून आला.
 हंगामी वसतिगृहाच्या उद्घाटनप्रसंगी सरपंच भगवान कोकाटे, गटशिक्षणाधिकारी एस.आर.चव्हाण, केंद्रप्रमुख जंगलसिंग राठोड, शाळा समिती अध्यक्ष, सदस्य, मुख्याध्यापक, शिक्षक व गावकरी उपस्थित होते. हंगामी वसतिगृह सुरू करण्याच्या या उपक्रमामुळे मजुरांच्या पाल्यांना मोठा आधार झाला असून, यामुळे त्यांच्या शिक्षणातही सातत्य राहणार आहे. 
 
Web Title: Labor's child base of residential hostel!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.