रुग्णांसाठी खाटांची संख्या कमी!

By admin | Published: April 4, 2017 12:25 AM2017-04-04T00:25:12+5:302017-04-04T00:25:12+5:30

आरोग्य प्रशासनातील अद्यापही बरेचे पदे रिक्त आहेत. उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असतानाही रुग्णालयात असणारी उपलब्ध खाटांची संख्या कमी आहे.

Lack of beds for patients! | रुग्णांसाठी खाटांची संख्या कमी!

रुग्णांसाठी खाटांची संख्या कमी!

Next

जिल्ह्याची स्थिती : ग्रामीण जनता आरोग्य सेवेपासून वंचित

नीलेश शहाकार - बुलडाणा
जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेत असलेल्या त्रुटी नेहमीच चर्चेचा विषय राहली आहे. आरोग्य प्रशासनातील अद्यापही बरेचे पदे रिक्त आहेत. शिवाय जिल्ह्यात दररोज उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असतानाही रुग्णालयात असणारी उपलब्ध खाटांची संख्या कमी आहे. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडत असून, बऱ्याच रुग्णांना सेवेपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.
जिल्ह्यातील सार्वजनिक वैद्यकीय सुविधेचा आढाव घेतला असता, जिल्हा सामान्य रुग्णालय, ग्रामीण रुग्णायांची संख्या २०, कॅन्सर, टी.बी. रुग्णालय एक, इतर शासकीय रुग्णालय ७५, प्रसूती गृह १३, प्राथमिक आरोग्य केंद्र ५२, उपकेंद्र २८० यातून ३५४ डॉक्टर व ९३४ परिचारिका रुग्णसेवेसाठी कार्यरत आहेत. शहर व तालुक्याच्या ठिकाणच्या रुग्णालयात मूलभूत सुविधा असल्या, तरी प्राथमिक आरोग्य केंद्रांपर्यंत अद्यापही बऱ्याच सुविधा पोहोचल्या नाहीत.
जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेचा कणा असणाऱ्या या सर्व रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रात एकूण १४९३ खाटांची सोय करण्यात आली आहे. आंतररुग्ण व बाह्य रुग्ण मिळून जिल्ह्यात दररोज एकूण ४०१० रुग्णांवर उपचार केला जातो. मात्र, रुग्णांच्या संख्येत खाटांची संख्या कमी असल्यामुळे शिवाय रिक्त पदांमुळे बऱ्याच वेळा रुग्णांना खासगी रुग्णालय किंवा इतर जिल्हा रुग्णालयात हलविल्या जाते.
----------
खासगी रुग्णालयाचा आधार
जिल्ह्यात ४७६ खासगी रुग्णालय असून, येथे २२२० खाटांची सोय आहे. त्यामुळे शासकीय उपचारापासून वंचित राहिलेल्या रुग्णांना खासगी दवाखान्या उपचार घेत, आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. त्यामुळे वेळवर योग्य उपचार न मिळाल्यामुळे गत एक वर्षात जिल्ह्यात विविध आजार ४६० पुरुष व ३५० स्त्रिया असे ८१० जणांना आपले प्राण गमवावे लागले. त्यामुळे जिल्ह्याच्या सुदृढ आरोग्यासाठी जिल्ह्यातील आरोग्य सुविधांचे बळकटीकरण करणे गरजेचे आहे.
----------
आरोग्य विभागातील आरोग्य तपासणी यंत्र बंद
जिल्हा सामान्य रुग्णालयात जवळपास ४६ प्रकाराचे विभाग असून, त्यामुळे विविध उपचार करण्यासाठी लहान-मोठी आरोग्य तपासणी यंत्रं उपलब्ध आहेत. मात्र, यातील इसीजी मशीन, सिटीस्कॅन मशीन, डायलेसीस युनिट, शिवाय अस्थि तज्ज्ञ विभाग, डोळे तपासणी विभाग, दिव्यांग तपासणी व नोंदणी विभागातील यंत्र तज्ज्ञ अधिकारी नसल्यामुळे बंद अवस्थेत पडून आहेत.

 

Web Title: Lack of beds for patients!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.