काच नदीवर पुलाचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:41 AM2021-09-10T04:41:54+5:302021-09-10T04:41:54+5:30

डोणगाव येथील स्मशानभूमीजवळ असलेल्या काच नदीपात्रावर पूल बांधणे अत्यंत आवश्यक आहे. या ठिकाणावरून काही अंतरावर पाटबंधारे विभागाकडून काही वर्षांपूर्वी ...

Lack of bridge over glass river | काच नदीवर पुलाचा अभाव

काच नदीवर पुलाचा अभाव

Next

डोणगाव येथील स्मशानभूमीजवळ असलेल्या काच नदीपात्रावर पूल बांधणे अत्यंत आवश्यक आहे. या ठिकाणावरून काही अंतरावर पाटबंधारे विभागाकडून काही वर्षांपूर्वी शेतजमिनीची आणि गावाची वॉटर लेवल वाढावी यासाठी नदीपात्रात भिंत बांधण्यात आली होती. परंतु नको त्या ठिकाणी भिंत बांधल्यामुळे या ठिकाणापासून पाठीमागे पाणी तुंबल्याने कऱ्हाळवाडी, लोणी गवळी, आंध्रुड, शेलगाव इत्यादी शेत शिवारात शेतजमिनी असलेल्या नागरिकांना जाण्यायेण्याचा रस्ता नदीतील पाण्यामुळे बंद झाला आहे. तरीदेखील नागरिक वेळ वाचवण्यासाठी तुंबलेल्या पाण्यातून ये-जा करत आहेत. त्यामुळे तुंबलेल्या पाण्यामुळे नागरिकांना नाहक त्रास होत असून नागरिकांना पावसाळ्यामध्ये अनेक अडचणीला सामोर जावे लागते. नदीच्या या तिरावरून त्या तिरावर जाण्यासाठी गावातील नागरिक, शेतकरी व मजदूर कंबरेपेक्षा जास्त पाण्यातून ये-जा करत असतात. दुसऱ्या बाजूने जाण्यासाठी नागरिकांना ३ ते ४ किलोमीटर दुरवरून फिरून यावे लागते. त्यामुळे ग्रामस्थ वेळ वाचवण्याकरिता जिवाची पर्वा न करता जीव धोक्यात घालून नदी पार करतात.

पूल बांधण्याची मागणी

ग्रामपंचायत प्रशासनाने तत्काळ या मागणीची दखल घेऊन या नदीवर पुलाचे बांधकाम करावे, अशी मागणी सागर बाजड यांनी निवेदनातून केली आहे. यावेळी भागवतराव बाजड, अरुणराव वडावकर, भाजप शहर अध्यक्ष विलास परमाळे, आकाश बाजड, रोहित डागर, राहुल श्रीनाथ, चंद्रकांत वाघमारे, रोहित गवई, अक्षय काळे, हरीष इंगळे, साजन शाह, हुसेन गवई, सचिन मोरे, अंकुश मोहळे आदी उपस्थित होते.

090921\new doc 2021-09-09 08.33.55_1.jpg

निवेदन देण्यात आले त्यावेळी अर्जुनराव वानखेडे

Web Title: Lack of bridge over glass river

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.