खामगाव पंचायत समितीलाच स्वच्छतेचे वावडे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2019 03:37 PM2019-12-06T15:37:25+5:302019-12-06T15:37:46+5:30

गुरुवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास कार्यालयाला भेट देऊन पाहणी केली असता, स्वच्छतेचे अतिशय विदारक चित्र दिसून आले.

 Lack of Cleanliness in Khamgaon Panchayat Samiti | खामगाव पंचायत समितीलाच स्वच्छतेचे वावडे!

खामगाव पंचायत समितीलाच स्वच्छतेचे वावडे!

googlenewsNext


देवेंद्र ठाकरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘स्वच्छ भारत मिशन’ अभियान सुरु करुन स्वच्छतेचा कानमंत्र दिला आहे. त्यांच्या आदेशानुसार देशभर स्वच्छता अभियान धडाक्यात राबविले जात आहे. या अभियानात सरकारी कार्यालयेही सहभागी आहेत. मात्र, ज्या विभागांवर स्वच्छता अभियान यशस्वी करण्याची जबाबदारी आहे, तेच कार्यालये घाणीच्या विळख्यात सापडले आहेत.
पंचायत समिती कार्यालयांची स्वच्छता नेमकी कुठपर्यंत आली आहे, हे पाहण्यासाठी लोकमत चमूने भेटी देऊन तेथील स्वच्छतागृह, परिसराची पाहणी केली. यात पंचायत समित्यांमध्येच दिव्याखाली अंधार असल्याचे विदारक चित्र जिल्ह्यातील पंचायत समिती कार्यालयांमध्ये ‘लोकमत स्टिंग आॅपरेशन’ मध्ये दिसून आले. कार्यालयातील कर्मचारीही अस्वच्छतेमुळे त्रस्त आहेत. परंतु स्वत: स्वच्छता करण्याची त्यांची तयारी नसल्याचे दिसून आले.
खामगाव पंचायत समितीत गुरूवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास भेट दिली असता, स्वच्छता अभियान केवळ कागदावर असल्याचे दिसून आले. फलक लावून जनजागृतीचा संदेश देणाऱ्या कार्यालयातच स्वच्छतेचे ंिधंडवडे निघाले आहेत. स्वच्छतागृहे तंबाखू, खर्रा, गुटख्याने रंगलेली आहेत. मुत्रीघरात पाण्याची सुविधा नसल्याने येथे सर्वत्र दुर्गधी पसरली आहे. कार्यालय परिसरात कचरा कुंडी नसल्याने कचरा सर्वत्र पसरलेला दिसून आला.
असाच प्रकार इतरही कार्यालयात दिसून आला. त्यामुळे शासकीय कार्यालयात स्वच्छतेसाठी उपाययोजना राबविल्या जात नसल्याचे स्टिंग आॅपरेशनच्या माध्यमातून दिसून आले. खामगाव पंचायत समितीत स्वच्छतेचे तीन-तेरा तीनतेरा वाजले आहे. गुरुवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास कार्यालयाला भेट देऊन पाहणी केली असता, स्वच्छतेचे अतिशय विदारक चित्र दिसून आले.

असे केले स्टिंग आॅपरेशन!
खामगाव तालुक्यात ग्रामीण भागात स्वच्छतेच्या दृष्टीने पंचायत समितीकडून मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात येते. गाव स्तरावर स्वच्छतेच्या दृष्टीने प्रयत्नही करण्यात येतात. परंतु या सर्व प्रक्रीयेत मॉनिटरिंग करणाºया खामगाव पंचायत समिती कार्यालय आवारातच अस्वच्छता पसरली आहे, अशी माहिती ‘लोकमत’ प्रतिनिधीला मिळाली. त्यानूसार गुरूवार ५ डिसेंबर रोजी पंचायत समिती कार्यालय परिसरात जाऊन पाहणी करण्यात आली. यावेळी पंचायत समिती कार्यालयालाच अस्वच्छतेचे ग्रहण लागल्याचे दिसून आले. इमारतीच्या भिंती गुटख्याच्या पिचकाऱ्यांनी रंगलेल्या दिसून आल्या. स्वच्छता गृहातही अस्वच्छता दिसून आली. ज्या बेसीनचा वापर स्वच्छतेसाठी होतो, ते बेसिनच घाण झालेले दिसून आले. आवारातही अनेक ठिकाणी अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले असल्याचे दिसून आले.


आठवड्यातून एकदा स्वच्छता मोहिम राबविण्यात येते. दररोज साफसफाई करणे शक्य नाही. नागरिकांनीही स्वच्छता ठेवण्याची गरज आहे.
- सुमित जाधव
सहाय्यक गटविकास अधिकारी

Web Title:  Lack of Cleanliness in Khamgaon Panchayat Samiti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.