पक्क्या विटांची कमतरता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:28 AM2021-01-02T04:28:36+5:302021-01-02T04:28:36+5:30
आधीच बांधकाम साहित्याचे वाढलेले दर त्यात आता पेट्रोल, डिझेल, गॅसच्या दरवाढीची भर पडली आहे. इंधनाचे दर वाढल्याने वाहतुकीचा खर्चही ...
आधीच बांधकाम साहित्याचे वाढलेले दर त्यात आता पेट्रोल, डिझेल, गॅसच्या दरवाढीची भर पडली आहे. इंधनाचे दर वाढल्याने वाहतुकीचा खर्चही वाढला आहे. पर्यायाने बांधकाम साहित्याचा दरात वाढ झाली आहे. वाढत्या दराने बांधकाम व्यावसायिकांवर मंदीचे ढग कोसळल्याने दिसून येत आहेत. पेट्रोल व डिझेल, गॅस सर्व तोट्यात महागाईने डोके वर काढले आहे. मुद्रांक शुल्क कमी केलेला असला तरी बांधकाम साहित्याचा दरावर मर्यादा आणण्यासाठी इंधनाचे दरदेखील आटोक्यात आणण्यासाठी सरकारने प्रयत्न करावे, अशी मागणी बांधकाम व्यावसायिकांडून करण्यात येत आहेत. दिवाळीनंतर बांधकाम साहित्याचे दर नेहमी वाढतात. बहुतांश लोक दिवाळीनंतर घराच्या बांधकामाला सुरुवात करतात. त्याचे मुख्य कारण बांधकामासाठी लागणारे पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध असते व गवंडीसुध्दा सहज उपलब्ध होतात. परंतु यंदा बांधकाम साहित्याचे दर वाढले आहेत. सिमेंट, लोखंड, गिट्टीच्या दरातही वाढ झाली आहे.