विजेअभावी उद्योगधंदे अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2019 01:57 PM2019-09-02T13:57:23+5:302019-09-02T13:57:31+5:30

येथील ३३ केव्ही उपकेंद्रातील ५० टक्के उपकरणे हे निकामी झाली आहेत.

Lack of Electricity industry in trouble buldhana | विजेअभावी उद्योगधंदे अडचणीत

विजेअभावी उद्योगधंदे अडचणीत

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
साखरखेर्डा : कमी दाबाच्या विज पुरवठ्यामुळे गावातील अनेक विद्यूत उपकरणे निकामी झाली आहेत. धड खेड्यात नाही आणि धड शहरातही नाही अशी अवस्था साखरखेर्डावासियांची झाली आहे. विज पुरवठा सुरळीत नसल्याने छोटे - मोठे उद्योग आपली बासने गुंडाळून सुविधा असलेल्या ठिकाणी बस्तान मांडीत आहेत.
सिंदखेडराजा तालुक्यात सर्वात मोठे गाव म्हणून साखरखेर्डा या गावाची ओळख आहे . परंतू आजही काही बाबतीत या गावात पाहीजे त्या सुविधा मिळत नाही. त्यामुळे अनेक व्यवसाय शहरात जात असल्याची बाब निदर्शनास येत आहे. हा सर्व प्रकार थांबविण्यासाठी विज वितरण कंपनीने येथे अद्ययावत उपकरणे बसवून विज पुरवठा सुरळीत करण्याची गरज आहे. साखरखेर्डा या गावची लोकसंख्या १८ हजार असून परिसरातील शिंदी , पिंपळगाव सोनारा , राताळी , मोहाडी , सवडद , माळखेड , गुंज , सावंगीभगत , गोरेगाव , उमनगाव , काटेपांग्री , वडगावमाळी , सायाळा , बाळसमुद्र , तांदुळवाडी, दरेगाव येथे साखरखेर्डा येथील ३३ केव्ही उपकेंद्रावरुन विज पुरवठा केला जातो.
येथील ३३ केव्ही उपकेंद्रातील ५० टक्के उपकरणे हे निकामी झाली आहेत. उपकेंद्रात साखरखेर्डा गाव फिडर , शेंदुर्जन गाव फिडर , आणि इतर गावांचे फिडर हे वेगवेगळे होते . मागील तीन वर्षात एक- एक फिडर बंद होत आहे. सर्व लोड हा साखरखेर्डा फिडरवर टाकला आहे .शेतीचा विज पुरवठा करतांना ग्रामीण भागात भारनियमन करुन विज पुरवठा केला जातो. त्यावेळी साखरखेर्डा गावातील विज ही कमी दाबावर असते. गेल्या आठवडाभरापासून विज गूल होत असताना त्याचे कारण तरी कुणाला विचारावे? असा प्रश्न निर्माण होत आहे. विजेची समस्या निर्माण झाल्याने छोटे, मोठे उद्योगधंदे अडचणीत आले आहेत. परिणामी त्यांना सुविधा उपलब्ध असलेल्या ठिकाणी आपले बस्तान मांडले आहे.
येथे कनिष्ठ अभियंता नाही, लाईनमन नाही, आॅपरेटर आणि काही दोन चार कर्मचाऱ्यांनाच कामे करावी लागत आहेत. त्यामुळे भविष्यात या उपकेंद्राचा डोलारा केंव्हाही बंद पडू शकतो. त्यासाठी वेळीच लक्ष देण्याची गरज झाली आहे, अशी मागणी शिवसेना जिल्हा उपप्रमूख बाबूराव मोरे , सभापती राजेश ठोके , महेंद्र पाटील, गोपालसिंग राजपूत, राकाँ. शहराध्यक्ष दत्ता घोडके, सुजित महाजन , युवासेना तालुका प्रमुख संदीप मगर, संदिप सोनुने यांनी केली आहे .


विज वितरण कंपणीने वेळीच दखल घेतली नाही तर विज वितरण कंपनीच्या कार्यालयावर मोर्चा काढून तीव्र आंदोलन करण्यात येईल.
- महेंद्र पाटील
साखरखेर्डा


तालुक्यात मी एकटाच कनिष्ठ अभियंता आहे. सर्व ठिकाणचा पसारा पाहणे कठीण आहे. साखरखेर्डा गावातील विजपुरवठा सुरळीत करुन देण्याचा प्रयत्न सुरु आहे.
- भुषण देवरे
प्रभारी कनिष्ठ अभियंता
महावितरण, साखरखेर्डा

Web Title: Lack of Electricity industry in trouble buldhana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.