धामणगाव-पारध रस्त्यावरील पुलावर कठड्याचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:23 AM2021-06-28T04:23:32+5:302021-06-28T04:23:32+5:30

येथील पुलावर बांधकामापासूनच संरक्षक कठडे नाहीत. सध्या या मार्गावर रहदारी वाढली आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. सध्या ...

Lack of embankment on the bridge on Dhamangaon-Pardh road | धामणगाव-पारध रस्त्यावरील पुलावर कठड्याचा अभाव

धामणगाव-पारध रस्त्यावरील पुलावर कठड्याचा अभाव

Next

येथील पुलावर बांधकामापासूनच संरक्षक कठडे नाहीत. सध्या या मार्गावर रहदारी वाढली आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. सध्या पावसाळा सुरू झाल्याने नदीला मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी येते. एखादे वेळेस पाऊस सुरू असला, तर रात्रीचा वाहनधारकांना अंदाज न आल्यास वाहन पुलाच्या खाली जाऊ शकते. त्यामुळे मोठा अपघात होऊ शकतो. विदर्भ व मराठवाड्याच्या सीमेवर असलेल्या धामणा नदीवरील पुलाला कठडे लावण्याची मागणी अनेक वर्षांपासून केली जात आहे. परंतु या मागणीकडे दुर्लक्षच केले जात असल्याचे दिसून येत आहे. नदी अथवा पुलाचे बांधकाम करताना अंदाजपत्रकात संरक्षक कठड्यासह अन्य खर्च नमूद असतो, परंतु या बाबीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून लक्ष दिले जात नसल्याने पुलावर कठडे बसविण्यात आलेले नाहीत.

Web Title: Lack of embankment on the bridge on Dhamangaon-Pardh road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.