लोणार पर्यटन नगरीमध्ये सुविधांचा अभाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:20 AM2021-07-24T04:20:51+5:302021-07-24T04:20:51+5:30
लोणार : जगप्रसिद्ध खाऱ्या पाण्याचे सराेवर असलेल्या लाेणार येथे गत काही दिवसांपासून सुविधांचा अभाव असल्याने पर्यटकांमध्ये नाराजीचा ...
लोणार : जगप्रसिद्ध खाऱ्या पाण्याचे सराेवर असलेल्या लाेणार येथे गत काही दिवसांपासून सुविधांचा अभाव असल्याने पर्यटकांमध्ये नाराजीचा सूर आहे. सराेवराकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याची दयनीय अवस्था बनली आहे. तसेच सराेवरात माहितीदर्शक फलक नसल्याचे चित्र आहे. याकडे नगरपालिका प्रशासनासह शासनाने लक्ष देण्याची गरज आहे.
धार परिसर, प्राचीन मंदिरे व सरोवराच्या मुख्य ठिकाणी माहितीफलक लावण्यात यावेत, अशी मागणी शिव छत्र मित्र मंडळ संस्थापक-अध्यक्ष नंदकिशोर मापारी यांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांच्यामार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ५ फेब्रुवारी रोजी लोणार सरोवर विकास आराखड्यासंदर्भात संबंधित विभागांना विकास कामांसंदर्भात सूचना दिल्या हाेत्या. तसेच विकास कामाला चालना मिळावी यासाठी निधीची सुद्धा घोषणा केली होती. परंतु, वन्यजीव विभाग प्रादेशिक, सार्वजनिक बांधकाम विभाग, वन विभाग व नगरप्रशासनात विकास कामांविषयी उदासीनता असल्याने कामे रखडली आहेत.
समन्वयाचा अभाव
लाेणार सराेवराचा विकास हाेण्यासाठी वन्यजीव विभाग, सार्वजनिक बांधकाम, वन विभाग आणि नगरपंचायत प्रशासनाने समन्वय ठेवून कामे करण्याची गरज आहे. मात्र, गत काही दिवसांपासून या विभागांमध्ये समन्वय नसल्याने विकास कामे रखडली आहेत.