भुमराळा परिसरात शेतरस्त्यांचा अभाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:22 AM2021-06-27T04:22:21+5:302021-06-27T04:22:21+5:30
वन्य प्राण्यांचा हैदाेस बुलडाणा : तालुक्यातील माळविहीर परिसरात वन्य प्राणी उन्हाळी मिरची व इतर पिकांचे माेठ्या प्रमाणात नुकसान ...
वन्य प्राण्यांचा हैदाेस
बुलडाणा : तालुक्यातील माळविहीर परिसरात वन्य प्राणी उन्हाळी मिरची व इतर पिकांचे माेठ्या प्रमाणात नुकसान करीत आहेत. त्यामुळे वन्य प्राण्यांचा बंदाेबस्त करण्याची गरज आहे.
कोविड लसीकरणास उत्स्फूर्त प्रतिसाद
मेहकर : काेराेनाचा संसर्ग राेखण्यासाठी शासनाकडून लसीकरणावर भर देण्यात येत आहे. अंत्री देशमुख येथे लसीकरण शिबिर घेण्यात आले. या शिबिराला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मेहकर येथे व इतर ठिकाणी गावातील सुमारे २०० लोकांनी पहिला डोस पूर्ण केला. तसेच त्यातील काही लोकांनी लसीची दुसरी मात्राही पूर्ण केली.
खासगी रुग्णालयांना पाच लाख करावे लागणार परत
बुलडाणा : माेठ्या प्रमाणात वाढल्यानंतर खासगी रुग्णालयांमध्ये अनेक रुग्ण दाखल झाले हाेते. काही खासगी रुग्णालयांकडून जादाची बिले आकारण्यात येत असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे आल्या हाेत्या. या तक्रारींवरून प्रशासनाने १७ ऑडिटरची नेमणूक केली हाेती. ऑडिटरकडे आलेल्या तक्रारींवरून आतापर्यंत पाच लक्ष ८ हजार ६५० रुपये जास्तीचे घेतल्याचे समाेर आले आहे. त्यामुळे या रुग्णालयांना ही रक्कम रुग्णांना परत करावी लागणार आहे.
पीक कर्जवाटपाची गती वाढवा !
बुलडाणा : खरीप हंगाम सुरू झाला आहे. मान्सूनपूर्व पाऊस जिल्ह्यात होत आहे. त्यामुळे शेतकरी आपली शेती पेरणीसाठी सज्ज करत असून, शेतकरी जोमाने खरीप हंगामाच्या तयारीला लागला आहे. त्यामुळे बँकांनी पीककर्ज वाटपाची गती वाढवावी, अशी सूचना पालकमंत्र्यांनी केले आहे.
मुद्रांक खरेदीसाठी हाेतेय शेतकऱ्यांची गर्दी
बुलडाणा : खरीप हंगाम सुरू झाल्याने शेतकरी पेरणीसाठी तयारी करीत आहेत. पीक कर्जासाठी लागणाऱ्या मुद्रांकांचा तुटवडा निर्माण झाल्याने ज्या दुकानावर उपलब्ध आहे तेेथे माेठ्या प्रमाणात गर्दी हाेत असल्याचे चित्र आहे.
सवलतीत धान्य मिळाल्याने दिलासा
बुलडाणा : राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना आणि शेतकरी योजनेंतर्गत समाविष्ट न झालेल्या केशरी शिधापत्रिकाधारकांनाही आता सवलतीत धान्य देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून, त्याची अंमलबजावणी जून महिन्यापासून हाेणार आहे.
गुड माॅर्निंग पथक गायब
धामणगाव बढे : परिसरातील अनेक गावंमध्ये गुड माॅर्निंग पथक गायब झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे पुन्हा उघड्यावर शाैच करण्याचे प्रमाण वाढले आहे. पावसाळ्यास सुरुवात हाेणार असल्याने, गुड माॅर्निंग पथके स्थापन करण्याची गरज आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन कारवाई करण्याची गरज आहे.
काेराेनाने चांगले धडे शिकविले
उंद्री : काेराेना महामारीची भयंकर लाट आपल्याला बरेच धडे शिकवून गेली. अहाेरात्र सुसाट वेगाने सैरावैरा धावणारा माणूस मृत्यूचे भय उराशी बाळगून कासवाच्या गतीने चालायला शिकला, असे मत मुरलीधर महाराज हेलगे यांनी व्यक्त केले.
ग्रामीण भागात आयुर्वेदिक काढ्याला महत्त्व
सुलतानपूर : काेराेनाची दुसरी लाट ग्रामीण भागापर्यंत पाेहोचली हाेती. अनेकांना काेराेनाची लागण झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सध्या ग्रामीण भागात आयुर्वेदिक काढ्याला महत्त्व आले आहे.
देऊळगाव राजा परिसरात अवैध व्यवसायांना ऊत
देऊळगाव राजा : शहर व तालुक्यात गत काही दिवसांपासून अवैध व्यवसाय माेठ्या प्रमाणात वाढले आहेत. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जुगारावर आतापर्यंत वेळाेवेळी कारवाई केली आहे. मात्र, स्थानिक पाेलिसांचे या अवैध व्यवसायाकडे दुर्लक्ष हाेत असल्याचे चित्र आहे.