दमदार पावसाअभावी खामगावमध्ये १० हजार हेक्टरवरील पेरणी रखडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 11:58 AM2021-07-11T11:58:58+5:302021-07-11T11:59:05+5:30
Khamgaon News : ७१४७८ हेक्टरवर पेरणी झाली असून, १० हजार हेक्टरवरील पेरणी रखडली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : तालुक्यात जुलै महिन्याचा पहिला आठवडा संपला असला तरी अद्याप पेरणी पूर्ण झाली नाही. तालुक्यात ७१४७८ हेक्टरवर पेरणी झाली असून, १० हजार हेक्टरवरील पेरणी रखडली आहे.
तालुक्यात १ लाख २८ हजार ५०८ हेक्टर भौगोलिक क्षेत्र असून, ८१८०४ हेक्टर क्षेत्र वहितीखाली आहे. प्प्रारंभी चांगला पाऊस पडला. त्यामुळे काही शेतक-यांनी पेरणी केली. मात्र, त्यानंतर पावसाने दडी दिली. त्यामुळे पेरणी रखडली. मूग आणि उडिदाची पेरणी विलंबाने झाली, तर उत्पादनात मोठी घट येते. त्यामुळे काही भागातील शेतक-यांनी मुबलक पाऊस नसतानाही पेरणी केली. पावसाचा खंड पडल्याने शेतक-यांवर दुबार पेरणीचे संकट कोसळले आहे. तालुक्यात ६७९८ हेक्टरवर बागायती कापसाची, तर १९११६ हेक्टरवर जिरायती कापसाची पेरणी करण्यात आली आहे.
तसेच ३०९१५ हेक्टरवर सोयाबीन, तूर ७०३०, मूग २९६५, उडीद २०२४, ज्वारी १३९१, बाजरी ८१, मका ४०१ तर इतर पिकांची ६२० हेक्टरवर पेरणी करण्यात आली आहे. आता दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.