लाइनमनअभावी विद्युतची कामे रखडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:39 AM2021-08-14T04:39:45+5:302021-08-14T04:39:45+5:30
पीकविमा योजनेचा लाभ देण्याची मागणी मोताळा: अतिपावसामुळे मागील वर्षी पिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्याची नुकसान भरपाई मिळाली, परंतु ...
पीकविमा योजनेचा लाभ देण्याची मागणी
मोताळा: अतिपावसामुळे मागील वर्षी पिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्याची नुकसान भरपाई मिळाली, परंतु पीकविमा योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना पीकविम्याचा लाभ शासनाने त्वरित द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याची मागणी
देऊळगाव राजा : शहरातील मुख्य मार्गावर लघू व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे. मात्र, वारंवार वाहतुकीचा खोळंबा होत असून, लहान-मोठे अपघातही नेहमीचे झाले आहे. शहरातील अतिक्रमण काढण्याची मागणी होत आहे.
तलाठ्याच्या रिक्त पदामुळे कामे खोळंबली
बुलडाणा: जिल्ह्यात अनेक ठिकाणी तलाठ्याची पदे रिक्त आहेत. या रिक्त पदामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची कामे खोळंबली आहेत. एका तलाठ्याकडे दोन ते तीन गावांचा कारभार देण्यात आलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वेळेवर कागदपत्र मिळत नाही.