लाेणार ग्रामीण रुग्णालयात लसीचा तुटवडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 04:15 AM2021-05-04T04:15:26+5:302021-05-04T04:15:26+5:30
स्थानिक ग्रामीण रुग्णालयात मागील पाच दिवसापासून कोविड लस उपलब्ध नसल्याने नागरिकांना शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे़ ...
स्थानिक ग्रामीण रुग्णालयात मागील पाच दिवसापासून कोविड लस उपलब्ध नसल्याने नागरिकांना शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे़ तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना लस नसल्याने लसीकरण पाच दिवसापासून बंद झाले आहे. यापूर्वी नागरिकांनी कोविशिल्डचा पहिला डोस घेतल्याने दुसरा डोस घेण्यासाठी नागरिक ग्रामीण रुग्णालयातील लसीकरण केंद्राबाहेर प्रतीक्षा करीत आहे. परंतु ग्रामीण रुग्णालयाबाहेर कोविड लस उपलब्ध नाही असा फलक लावण्यात आला. त्यामुळे आधी ज्यांनी ही लस घेतली त्यांना या लसीचा दुसरा डोस मिळणार का नाही याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. कोव्हॅक्सिन व कोविशिल्ड दोन्ही लसीचा तुटवडा असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांना पहिला डोस कोविशिल्डचा दिला असल्याने त्यांना दुसरा डोस अन्य लसीचा चालणार नाही. त्यामुळे नागरिक धास्तावले आहेत. याकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन लस उपलब्ध करून देण्याची मागणी हाेत आहे़