भगिनींनो उणेदुणे काढणे सोडून कौतुक करा व आनंदी जीवन जगा - बबिताताई ताडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2019 02:19 PM2019-12-04T14:19:26+5:302019-12-04T14:19:36+5:30
कोणतेही कार्य करीत असताना त्याची व्यवस्थित तयारी करूनच मग पुढे जा., असा मोलाचा सल्ला केबीसी फेम बबिताताई ताडे यांनी दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: आपले आयुष्य जगत असतांना इतरांचे उणेदुणे काढत बसण्यापेक्षा त्यांचे कौतुक करा व आनंदी जीवन जगा. कोणतेही कार्य करीत असताना त्याची व्यवस्थित तयारी करूनच मग पुढे जा., असा मोलाचा सल्ला केबीसी फेम बबिताताई ताडे यांनी दिला.
खामगाव येथील कोल्हटकर स्मारक मंदिर सभागृहात आयोजीत ‘माणिनी’ महिलांचे व्यासपिठ या उपक्रमाचे उद्घाटन करतांना त्या बोलत होत्या. ‘माणिनी’ उद्घाटन कार्यक्रमानंतर गोड सुरांच्या तालावर बहरदार गाण्यांच्या मैफिल रंगली व त्याला सोबत होती ती म्हणजे आरजे पूजाची. हीच्या जोडीने आयुष्यातील वेगवेगळ्या गप्पागोष्टीचा खेळ खेळत बक्षिसांची लयलूट करीत खºया अर्थाने ‘माणिनीं’नी रविवारचा दिवस स्वत:साठी जगला. यावेळी माणिनी ग्रुपच्या अध्यक्षा राजकुमारी चौहान यांनी यापुढेही आपल्या माणिनी सदस्या वेगवेगळ्या कार्यक्रमातून व्यक्त होत राहतील असे आश्वासन दिले. या कार्यक्रमास पुष्पा जवरे, रेणुका महाजन, वैशाली पाटील, शीतल राठी, ज्योती अग्रवाल, वर्षा पांडव, वैशाली पुदागे, काजल तांबी, सुलोचना गणोरकर, सोनाली तराळे, वनिता मोरे, सबा अंजुम, नगमा परवीन, स्नेहल गावंडे यांच्या सोबत आरजे पूजा काळे यांचे सहकार्य लाभले.