चिखली येथे लहुजी शक्ती सेनेचा ‘रास्ता रोको’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 01:37 AM2018-03-24T01:37:28+5:302018-03-24T01:37:28+5:30
चिखली(बुलडाणा) : तालुक्यातील इसरूळ येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि मांगीरबाबा देवस्थान उद्ध्वस्त करण्यासह समाजातील महिला-पुरुषांवर लाठीचार्ज करून चुकीचे व खोटे गुन्हे दाखल केले असल्याचा आरोप करीत हे गुन्हे मागे घेण्यात यावेत तसेच अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा सन्मानपूर्वक पुन्हा बसविण्यात यावा, आदी मागण्यांसाठी लहुजी शक्ती सेनेच्यावतीने जिल्हाध्यक्ष गजानन पवार यांच्या नेतृत्वात २३ मार्च रोजी चिखलीत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

इसरूळ येथे १९ मार्च रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा व मांगीरबाबा देवस्थान बळाचा वापर करून हटविण्यासह यास विरोध करणा-या कैलास खंदारे यांच्यास समाजबांधव व महिलांवर लाठीचार्ज करण्यात येऊन त्यांच्यावरच खोटे गुन्हे दाखल केले असल्याचा आरोप करीत हे गुन्हे मागे घेण्यात यावे व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा पुन्हा सन्मानपूर्वक बसविण्यात यावा, या मागणीसाठी जालना खामगाव महामार्गावरील स्थानिक खामगाव चौफुलीवर लहुजी शक्ती सेनेच्यावतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे या मार्गावरील वाहतूक काहीकाळ विस्कळीत झाली होती.
दरम्यान, चिखली पोलिसांनी आंदोलकांना स्थानबद्ध केल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्ववत झाली. या आंदोलनात जिल्हाध्यक्ष गजानन पवार यांच्यासह अंकुश तायडे, ओमप्रकाश नाटेकर, राजू नाटेकर, समाधान निकाळजे, ज्ञानेश्वर साळवे, शेषराव बोके, संभाजी नाटेकर, नितीन साळवे, राजू साबळे, मनोज साळवे, विनोद बोरकर, संजय रोकडे, मधुकर पेटारे, सचिन नाडे, पप्पू अवसारमोल यांच्यासह बहुसंख्य समाजबांधव व महिला सहभागी झाल्या होत्या. याप्रकरणी तातडीने न्याय न मिळण्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा पवार यांनी दिला आहे.