३९१ व्या शिवजयंतीनिमित्त दिव्यांची आरास !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 05:40 AM2021-02-20T05:40:26+5:302021-02-20T05:40:26+5:30
छत्रपती शिवाजी महाराज जयंती चिखलीकरांच्यावतीने एखाद्या सणाप्रमाणे साजरी केली जाते. परंतू, शहरात शिवजयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रम जमावबंदीच्या नियमास अधीन राहून ...
छत्रपती शिवाजी महाराज जयंती चिखलीकरांच्यावतीने एखाद्या सणाप्रमाणे साजरी केली जाते. परंतू, शहरात शिवजयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रम जमावबंदीच्या नियमास अधीन राहून पारपडले. १८ फेब्रुवारी रोजी रक्तदान शिबीर पाडले. मध्यरात्री १२ वाजता आतषबाजी करण्यात आली. १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वाजता महाराजांच्या मूर्तीचे अभिषेक करून पूजन करण्यात करण्यात आले. त्यानंतर सकाळी ८:३० वाजता पाळणा आदी उपक्रम पारंपारीक पध्दतीने परंतू, सामाजिक अंतर राखून व मोजक्य शिवभक्तांच्या उपस्थित पार पडले. शहरातील लोकप्रतिनिधी, विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सहकार, सामाजिक, शैक्षणिक, औद्यागिक आदी सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी साधेपणाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करून अभिवादन केले. याठिकाणी नियमांचे उल्लंघन होणार याची दक्षता शिवभक्त शिवजयंती उत्सव समितीव्दारे घेण्यासह प्रामुख्याने मास्कचे वाटप करण्यात आले. संध्याकाळी पुतळा परिसरात दिव्यांची आरास मांडून दिपोत्सव साजरा करण्यात आला.
चिंच परिसर मित्रमंडळाव्दारे महाप्रसादाचे वितरण
स्थानिक चिंच परिसर मित्रमंडळच्यावतीने शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी आरती केल्यानंतर लाडूचा प्रसाद वाटण्यात आला. सायंकाळी माजी आ. राहुल बोंद्रे यांच्याहस्ते शिव भक्तांना महाप्रसाद म्हणून खिचडीचे वाटप करण्यात आले. आमदार श्वेता महाले व अनेक मान्यवरांनी भेटी देऊन शिवरायांच्या चरणी मस्तक टेकविले.
सोनेवाडी येथे मास्कचे वाटप
तालुक्यातील सोनेवाडी येथे शिवजयंतीनिमित्त एनएसजी कमान्डो अमोल तायडे यांच्या मार्गदर्शनात श्री करियर मिल्ट्री फाऊंडेशनच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराजांचे पूजन केल्यानंतर गावात घरोघरी जाऊन महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. सैलानी मार्गावरील प्रवाशांना, वाहनधारकानां संस्थेतर्फे मास्कचे वाटप करण्यात आले. यावेळी सागर तायडे, विठ्ठल पंडित, गजानन गायकवाड, गणेश पाटील, ज्ञानेश्वर जंजाळ, अमोल पंडीत व संस्थेचे विद्यार्थी उपस्थित होते.