शेतशिवारातून ठिबकचे साहित्य लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:35 AM2021-07-27T04:35:46+5:302021-07-27T04:35:46+5:30
शेतरस्त्याची दुरवस्था जानेफळ : मागील काही वर्षांत जानेफळ-सोनारगाव या पाणंद रस्त्याचे डांबरीकरण करण्यासाठी अनेकवेळा सर्वेक्षण करण्यात आले आहे. डांबरीकरण ...
शेतरस्त्याची दुरवस्था
जानेफळ : मागील काही वर्षांत जानेफळ-सोनारगाव या पाणंद रस्त्याचे डांबरीकरण करण्यासाठी अनेकवेळा सर्वेक्षण करण्यात आले आहे. डांबरीकरण होणार म्हणून या भागातील सर्व शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीचे दानपत्रदेखील दिले आहे.
नुकसानग्रस्तांना तातडीने मदत देण्याची मागणी
देऊळगाव कुंडपाळ : परिसरात झालेल्या जाेरदार पावसामुळे शेततलाव फुटल्याने जमीन खरडून गेली. विठ्ठल कैलास सरकटे, कैलास माणिकराव सरकटे, अनिल प्रकाश सरकटे, विलास गणेशराव सरकटे यांचे नुकसान झाले हाेते.
महागाई वाढल्याने सर्वसामान्य त्रस्त
किनगाव राजा : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे नागरिकांपुढे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशातच महागाईने डोके वर काढल्याने शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. डाळींचेही दर कडाडले असल्याने दररोजच्या जेवणातून डाळ गायब झाल्याचे चित्र आहे.
कॅशबॅक मेसेजद्वारे फसवणूक वाढली
बुलडाणा : तुम्हाला ३,९९९ रुपयांचा कॅशबॅक मिळाला, नोटिफिकेशन आयकॉनवर क्लिक करा, असे म्हणून शेतकऱ्याची फसवणूक केल्याची घटना मागील महिन्यात घडली होती. कॅशबॅक मेसेजद्वारे फसवणुकीचे प्रकार वाढले असल्याचे दिसून येते.
धामणगाव परिसरात भाजीपाला पिके बहरली
धामणगाव धाडः परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी भाजीपाल्याची लागवड केली आहे. सध्या शेतात गवार व भेडींची पिके बहरली आहेत. शेतकऱ्यांनी भाजीपाला पिकाची माेठ्या प्रमाणात लागवड केली आहे़
राजूर घाटातून दुचाकी लंपास
माेताळा : बुलडाणा मलकापूर रस्त्यावरील राजूर घाटाच्या शेवटच्या वळणावर उभी केलेली दुचाकी क्र. एमएच २८ बीएम ८५२० अज्ञात चाेरट्यांनी लंपास केली़ या प्रकरणी गणेश मनोहर पोकळे यांच्या फिर्यादीवरून पाेलिसांनी अज्ञात चाेरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़
वाहतुकीस अडथळा, चालकाविरुद्ध गुन्हा
माेताळा : माेताळा ते नांदुरा रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण हाेईल, असे वाहन उभे करणाऱ्या चालकाविरुद्ध बाेराखेडी पाेलिसांनी गुन्हा दाखल केला आहे़ पुढील तपास बाेराखेडी पाेलीस करीत आहेत़