धाेडप येथे ४६ हजारांचा ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:34 AM2021-05-23T04:34:22+5:302021-05-23T04:34:22+5:30

पाेलीसपाटील हा महत्त्वाचा दुवा किनगाव राजा : पोलीसपाटील हे शासनाचे कान व डोळे असून, गावपातळीवर काम करण्यासाठी महत्त्वपूर्ण ...

Lampas looted Rs 46,000 at Dhadap | धाेडप येथे ४६ हजारांचा ऐवज लंपास

धाेडप येथे ४६ हजारांचा ऐवज लंपास

Next

पाेलीसपाटील हा महत्त्वाचा दुवा

किनगाव राजा : पोलीसपाटील हे शासनाचे कान व डोळे असून, गावपातळीवर काम करण्यासाठी महत्त्वपूर्ण योजना जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी व गावातील तंटे मिटवण्यासाठी पोलीसपाटील हे महत्त्वाचा दुवा आहेत, असे प्रतिपादन अतिरिक्‍त पोलीस अधीक्षक बजरंग बनसोड यांनी व्यक्‍त केले.

खासगी काेचिंग क्लासेसला परवानगी द्या

बुलडाणा : काेविड-१९ नियमांचे काटेकोर पालन करून एका वर्गात २५ विद्यार्थी बसून कोचिंग क्लासेस सुरू करण्याची परवानगी देण्याची मागणी हाेत आहे. गत वर्षापासून काेचिंग क्लासेस बंद आहेत़ त्यामुळे, काेचिंग क्लासेस संचालक संकटात सापडले आहेत़.

पेट्रोल-डिझेलचे दर वाढल्याने मशागतीचे दर वाढले

धामणगाव धाड : गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या भावात सातत्याने वाढ होत असल्याने सर्वसामान्यांसह शेतीच्या मशागतीसही फटका बसला आहे. धामणगाव परिसरात शेतात नांगरणीसह इतर शेती मशागतीची कामे सुरू झाली आहेत.

नुकसानग्रस्त शेतकरी पीक विम्याच्या प्रतीक्षेत

धाड : परिसरात अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले हाेते. परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी विमा काढला हाेता. मात्र, या शेतकऱ्यांना विम्याचा लाभ मिळाला नाही. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याची गरज आहे.

लोणीगवळी सर्कलमधील रस्त्याची दुरुस्ती करा

डोणगाव : लोणीगवळी सर्कलमधील रस्त्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे विदर्भ अध्यक्ष सखाराम काळदाते यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. मागणी मान्य न झाल्यास आंदाेलन करण्याचा इशारा निवेदनात दिला आहे.

लॉकडाऊनऐवजी पर्यायी मार्ग काढा

बुलडाणा : काेराेना रुग्ण संख्या वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊन सुरू केले आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांचे माेठ्या प्रमाणात नुकसान हाेत आहे. त्यातून मार्ग काढावा, अशी मागणी जिल्हाभरातील व्यापाऱ्यांनी केली आहे.

सुतार कामगारांसाठी पॅकेज जाहीर करा

बुलडाणा : जिल्हाभरात मोठ्या प्रमाणात सुतार व्यवसाय करणारे सुतार कामगार आहेत. स्वत:ची मशीन घेऊन लाकडांना आकार देऊन आपला घर गाडा चालवण्यासाठी ते परिश्रम घेत आहेत. परंतु कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून त्यांना संकटाला तोंड द्यावे लागत आहे. सुतार कामगारांसाठीदेखील शासनाने स्वतंत्र आर्थिक पॅकेज द्यावे, अशी मागणी ज्ञानेश्वर जाधव यांनी केली आहे.

त्या शेतकऱ्यास मदत देण्याची मागणी

किनगाव जट्टू : येथील रामचंद्र कुंडलिक सोनुने यांच्या शेतातील उसाला आग लागून माेठ्या प्रमाणात नुकसान झाले हाेते़. खरीप हंगामास काही दिवसांचा अवधी असतानाच हे नुकसान झाले आहे़. त्यामुळे, साेनुने हवालदिल झाले आहे़त. शासनाने त्यांना तातडीने मदत देण्याची मागणी हाेत आहे़

चिखला काकड येथे काेराेना चाचणी

लाेणार : तालुक्यातील चिखला काकड येथे गत काही दिवसांपासून काेराेना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे़. आतापर्यंत गावात ६० ते ७० रुग्ण आढळले असून, एका युवकासह ६ जणांचा मृत्यू झाला आहे़. त्यामुळे, आराेग्य विभागाच्यावतीने गावात दाेन विशेष शिबिर घेऊन काेराेना चाचणी करण्यात आली़.

Web Title: Lampas looted Rs 46,000 at Dhadap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.