बुलडाणा जिल्हय़ातील जमिनीचे भाव १0 टक्क्यांनी महागले

By admin | Published: January 6, 2015 12:09 AM2015-01-06T00:09:39+5:302015-01-06T00:09:39+5:30

रेडिरेकनरचे नवीन दरातून मंदीची लाट कायम असल्याचे चित्र.

Land prices in Buldhana district rose by 10 per cent | बुलडाणा जिल्हय़ातील जमिनीचे भाव १0 टक्क्यांनी महागले

बुलडाणा जिल्हय़ातील जमिनीचे भाव १0 टक्क्यांनी महागले

Next

बुलडाणा : नवीन वर्ष सुरू होताच जमिनीच्या सरकारी दरात वाढ लागू करण्यात आली आहे. त्यामुळे जमिनीच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार मागील वर्षापेक्षा पुन्हा महागणार आहेत. बुलडाणा शहरात ही वाढ १0 ते १५ टक्के झाली असून, प्रत्यक्षात सरासरी १२ टक्के वाढ झाली आहे.
दरवर्षी वर्षाच्या पहिल्या दिवसापासून रेडिरेकनरचे नवीन वाढीव दर लागू केले जातात. यावर्षीसुद्धा ही दरवाढ पहिल्या दिवसापासूनच लागू करण्यात आली आहे; मात्र नगर परिषदेच्या हद्दीबाहेर हे दर काही प्रमाणात कमी आहेत.
बँका गृहकर्ज देताना आणि खरेदी-विक्रीचे व्यवहार करताना स्टॅम्प ड्युटीसाठी जमिनीचे सरकारी दर हेच आधार मानतात. त्यामुळे रेडिरेकनरच्या दराचा थेट परिणाम बाजारभावावर होतो.
बुलडाणा शहरातील विविध गट क्रमांकांमधील खुल्या जमिनीचे दर वाढले आहेत. शहरात मुख्य वस्त्या व परिसरातील भूखंडांपेक्षाही चिखली रोड, सागवन, सुंदरखेड तसेच मलकापूर रोडकडील भागातील भूखंडांचे दर जास्त आहेत. तर नव्याने विकसित होत असलेल्या जांभरून रोड, देऊळघाट रोड आणि सागवन या भागातही वाढ आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसांपासून रेडिरेकनरचे वाढीव दर लागू करण्यात आल्यामुळे स्टॅम्प खरेदी-विक्रीचे व्यवहार करणार्‍यांना स्टॅम्प ड्युटीचा खर्च आता मागील वर्षापेक्षा अधिक मोजावा लागणार आहे; मात्र यावर्षी दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे मंदीचे सावट पसरले आहे.
*भूखंडाचे भाव घसरले
बुलडाणा शहरालगतच्या सुंदरखेड, सागवन, जांभरून, मलकापूर रोड आणि चिखली रोडवरील भूखंडाचे भाव प्रचंड वाढविण्यात आले होते. मागील चार वर्षांपासून शासकीय दरापेक्षा कतीतरी पटीने दलालांनी भाव वाढविले होते; मात्र एक वर्षापासून या क्षेत्रात मंदीची लाट आल्यामुळे खरेदीदार मिळत नसल्यामुळे मंदी कायम आहे.

Web Title: Land prices in Buldhana district rose by 10 per cent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.