भूमिअभिलेखमध्ये कामे खोळंबली

By admin | Published: December 12, 2014 12:40 AM2014-12-12T00:40:48+5:302014-12-12T00:40:48+5:30

लोणार येथील रिक्त पदे भरण्याची मागणी.

Land records in land records | भूमिअभिलेखमध्ये कामे खोळंबली

भूमिअभिलेखमध्ये कामे खोळंबली

Next

लोणार (बुलडाणा) : येथील उपअधिक्षक भूमिअभिलेख कार्यालयात उ पअधिक्षकासह मुख्यालय सहाय्यक आणि आवक जावकांची पदे अनेक महिन्यापासून रीक्त आहे. यामुळे कार्यालयातील विविध कामांचा बोजवारा उडत आहे. भूमी अभिलेख कार्यालयात मुख्य अधिकारीच नसल्यामुळे तालुक्यातील रब्बी हंमागाची शेतकर्‍यांची कामे खोळंबली असून नागरीकांची अनेक कामे प्रलंबीत पडून आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याचे चित्र तालुक्यात पहायला मिळत आहे. तालुक्यातील शेतजमिनीचे नकाशे, टिपन उतारे, गाव नकाशे, नझूल नकाशे यासह इंग्रजकालीन महत्वपूर्ण मूळ दस्ताऐवजांची नोंद असलेल्या भूमी अभिलेख कार्यालयाचा कारभार अधिकार्‍याविना रामभरोसे सुरू आहे. शेतातील नंबर धुरे, शेतरस्ते, शिवरस्ते, गावरस्ते, नकाशानुसार आपल्या जमीनीची व जागेची हद्द कायम करणे या सार ख्या अनेक कामासाठी शेतकर्‍यांना व नागरीकांना या कार्यालयाचे उंबरठे झीजवावे लागत आहेत.

Web Title: Land records in land records

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.