‘लोणार’मध्ये प्री वेडिंग शूट, तर खिसा मोकळा करण्याची तयारी ठेवा! पुरातत्त्व विभागाने दिलीय ऑफर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 04:53 IST2025-02-28T04:53:38+5:302025-02-28T04:53:46+5:30

इच्छुक जोडप्यांना किमान सात दिवस आधी बुकिंग करणे बंधनकारक

laonaaramadhayae-parai-vaedainga-sauuta-tara-khaisaa-maokalaa-karanayaacai-tayaarai-thaevaa-pauraatatatava-vaibhaagaanae-dailaiya-ophara | ‘लोणार’मध्ये प्री वेडिंग शूट, तर खिसा मोकळा करण्याची तयारी ठेवा! पुरातत्त्व विभागाने दिलीय ऑफर...

‘लोणार’मध्ये प्री वेडिंग शूट, तर खिसा मोकळा करण्याची तयारी ठेवा! पुरातत्त्व विभागाने दिलीय ऑफर...

बुलढाणा : जगप्रसिद्ध लोणार सरोवर आणि परिसरातील ऐतिहासिक स्थळांवर प्री-वेडिंग शूटसाठी भारतीय पुरातत्त्व विभागाने नवीन नियम लागू केले आहेत. या नियमानुसार, आता येथे प्री-वेडिंग शूटसाठी ३५,००० रुपये शुल्क आकारले जाणार आहे. तसेच, इच्छुक जोडप्यांना किमान सात दिवस आधी बुकिंग करणे बंधनकारक असेल.

लोणार सरोवर हे महत्त्वपूर्ण वारसा स्थळ असून, दरवर्षी येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक भेट देतात. नैसर्गिक सौंदर्य आणि ऐतिहासिक पार्श्वभूमीमुळे येथे प्री-वेडिंग शूट करण्यास मोठी मागणी होती. मात्र, पुरातत्त्वीय ठिकाणांचे संरक्षण आणि  व्यवस्थापन सुधारण्यासाठीतीय पुरातत्त्व विभागाने हे शुल्क निश्चित केले आहे. इच्छुक जोडप्यांना विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावरून प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. तसेच, शूटदरम्यान ऐतिहासिक स्थळांचे कोणतेही नुकसान होणार नाही, याची जबाबदारी आयोजकांवर असेल. 

Web Title: laonaaramadhayae-parai-vaedainga-sauuta-tara-khaisaa-maokalaa-karanayaacai-tayaarai-thaevaa-pauraatatatava-vaibhaagaanae-dailaiya-ophara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Lonarलोणार