नांदुऱ्याच्या कोविड सेंटरवरील नाश्त्यात निघाल्या अळ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2020 05:21 PM2020-09-09T17:21:49+5:302020-09-09T17:21:57+5:30

नाश्त्यात आळया  निघाल्याचा व्हिडिओ व फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ माजली आहे .

The larvae left for breakfast at the Kovid Center in Nandura | नांदुऱ्याच्या कोविड सेंटरवरील नाश्त्यात निघाल्या अळ्या

नांदुऱ्याच्या कोविड सेंटरवरील नाश्त्यात निघाल्या अळ्या

Next

- सुहास वाघमारे  

   नांदुरा: नांदुरा तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांना उपचार देण्याकरिता  आय . टि.आय .चा  इमारतीत तयार करण्यात आलेल्या कोविड सेंटरमधील रुग्णांना दि.९ सप्टेबरच्या सकाळी दिलेल्या  नाश्त्यात आळया  निघाल्याचा व्हिडिओ व फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ माजली आहे .      नांदुरा तालुक्यातील कोरोनाबाधित पंचेचाळीस रुग्ण हे आ.टी.आ. चा इमारतमधील  कोविड सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. त्यांना दिनांक ९ सप्टेबर रोजी  उपमा  हा हा पदार्थ नाश्त्यामध्ये देण्यात आला रात्रीपासून उपाशी असणाऱ्या काही रुग्णांनी त्यावर ताव मारला मात्र त्यातील काहींना खाताना   या पदार्थांमध्ये अळ्या  दिसून आल्या.  यापैकी काही रुग्णांनी खिशातील मोबाइल काढून तात्काळ त्याचे फोटो काढले व व्हिडिओ तयार केला  व तो  व्हिडिओ  सोशल मीडियावर व्हायरल झाला. यामधील काही रुग्णांनी व्हिडिओ नाश्त्यात अळ्या निघाल्याने   याबाबत नाराजी व्यक्त करताना दिसतात .  याबाबत नांदूराचे तहसीलदार राहुल तायडे यांना विचारणा केली असता त्यांनी सदर प्रकार हा दि. ९ चा  सकाळचा असून त्यांना माहिती होताच त्यांनी कोविड सेंटरवर जाऊन याबाबत संबंधितांना विचारणा केली  व जेवणाची व नाश्त्याचि तपासणी करण्याकरिता  दोन कर्मचाऱ्यांना तिथे नेमून दिल्याची माहिती दिली.  कोरोना रुग्णांना  चांगले दर्जेदार जेवण व नास्ता द्यावा अशी मागणी यामधील कोरोणा रुग्णांची आहे.

सदर प्रकाराची माहिती होताच नवीन नाश्ता रुग्णांना दिला असून दोन कर्मचाऱयांची नियुक्ती जेवण व नास्ता ची तपासणी करण्याकरिता केली आहे.

- राहुल तायडे तहसीलदार नांदुरा  

Web Title: The larvae left for breakfast at the Kovid Center in Nandura

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.