प्राथमिक आरोग्य केंद्र मोजतेय शेवटची घटका - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:36 AM2021-05-21T04:36:18+5:302021-05-21T04:36:18+5:30

चिखली तालुक्यातील मंगरूळ नवघरे या गावाची लोकसंख्या १० ते १२ हजार आहे. येथे गेल्या तीनवर्षा पूर्वी शासनाने करोडो रुपये ...

The last factor measuring the primary health center - A | प्राथमिक आरोग्य केंद्र मोजतेय शेवटची घटका - A

प्राथमिक आरोग्य केंद्र मोजतेय शेवटची घटका - A

Next

चिखली तालुक्यातील मंगरूळ नवघरे या गावाची लोकसंख्या १० ते १२ हजार आहे. येथे गेल्या तीनवर्षा पूर्वी शासनाने करोडो रुपये खर्च करून प्राथमिक आरोग्य केंद्राची भली मोठी वस्तू बांधली. या वस्तूचे माजी आमदार राहुल बोन्द्रे यांनी दोन वेळा व आमदार श्वेता महाले यांनी एक वेळ उद्घाटन केले. कोविड १९ अर्थात कोरोना या महामारीच्या काळात मंगरूळ नवघरे येथे आतापर्यंत साधारणतः २०० ते २५० रुग्ण आढळले. त्यातील बरेच दुरुस्त ही झाले. या काळातील एकूण मुत्यू ची संख्या २५ व केवळ कोरोनाने मृत्यू झालेल्यांची संख्या १० ते १२ आहे. या महामारीच्या काळात सरकारी तसेच खाजगी दवाखान्यात रुग्णांना बेड उपलब्ध होणे कठीण झाले. परंतु मंगरूळ नवघरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्र करोडो रुपये खर्च करून धूळ खात पडले आहे . या दवाखान्यात १० बेड , २ व्हेंटिलेटर, दोन ओक्सिजन उपलब्ध असून सर्व सुखसुविधा उपलब्ध आहे. या दवाखान्याला अतिक्रमणने वेढलेले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र हे कर्मचाऱ्यांसह सुरू करण्यात यावे अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादलचे प्रदेश सरचिटणीस रविंद्र नारायणराव डाळीमकर यांनी दिला आहे.

Web Title: The last factor measuring the primary health center - A

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.