स्व. पंढरीनाथ पाटील समाधिस्थळाचा विकास व्हावा : राहुल बोंद्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:35 AM2021-01-23T04:35:42+5:302021-01-23T04:35:42+5:30

चिखली विधानसभा मतदारसंघातील ग्रामपंचायत निवडणुकीत नवनिर्वाचित ग्रा. पं. सदस्यांचा सत्कार तथा अभिनंदन सोहळा चिखली काँग्रेसच्या वतीने २३ जानेवारी रोजी ...

Late. Pandharinath Patil tomb should be developed: Rahul Bondre | स्व. पंढरीनाथ पाटील समाधिस्थळाचा विकास व्हावा : राहुल बोंद्रे

स्व. पंढरीनाथ पाटील समाधिस्थळाचा विकास व्हावा : राहुल बोंद्रे

googlenewsNext

चिखली विधानसभा मतदारसंघातील ग्रामपंचायत निवडणुकीत नवनिर्वाचित ग्रा. पं. सदस्यांचा सत्कार तथा अभिनंदन सोहळा चिखली काँग्रेसच्या वतीने २३ जानेवारी रोजी स्थानिक मौनीबाबा संस्थानमध्ये सकाळी ११ वाजता आयोजित केला आहे. या सोहळ्यासाठी राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या संपर्कमंत्री ना. यशोमती ठाकूर, पालकमंत्री ना. डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे चिखलीत आगमन होत आहे. यापृष्ठभूमीवर राहुल बोंद्रेंनी अनेक दिवसांपासूनची आपली मागणी पुढे रेटली आहे. या अनुषंगाने दोन्ही मंत्री स्व. पंढरीनाथ पाटील यांच्या समाधिस्थळाला भेट देणार आहेत. काँग्रेसच्यावतीने आयोजित सत्कार सोहळ्याला काँग्रेससह महाविकास आघाडीतील सर्व पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांची उपस्थिती राहणार आहे. या सोहळ्यातून ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांच्या पक्षीय बलाबलाचे गणित सुटणार असल्याने या कार्यक्रमाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. (वा. प्र.)

Web Title: Late. Pandharinath Patil tomb should be developed: Rahul Bondre

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.