उशीरा येणारे तूर पीक मातीमोल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2019 03:43 PM2019-12-27T15:43:43+5:302019-12-27T15:43:47+5:30
दाणे भरण्याच्या अवस्थेत असलेल्या तूरीला सर्वाधिक फटका बसत आहे. त्यामुळे यंदा तूरीच्या उत्पादनात घट येण्याचे संकेत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: खरीप हंगामात फटका बसल्याने यंदा शेतकऱ्यांचे अर्थचक्र तूर पिकाच्या भरवश्यावरच आहे. परंतू सध्या धुक्यामुळे तूरीच्या शेंगा काळ्या पडण्यास सुरूवात झाली आहे. उशीरा येणाºया तुरीचे पिक मोतीमोल होत आहे. ५० टक्के फुले व शेंगा लागण्याची अवस्था आणि दाणे भरण्याच्या अवस्थेत असलेल्या तूरीला सर्वाधिक फटका बसत आहे. त्यामुळे यंदा तूरीच्या उत्पादनात घट येण्याचे संकेत आहेत.
जिल्ह्यात तूर पिकाचे सरासरी क्षेत्र ६५ हजार ५३ हेक्टर आहे. त्यापैकी यंदा ११८ टक्के म्हणजे ७६ हजार ५०७ हेक्टर क्षेत्रावर तूरीचे पीक आहे. यामध्ये ४० टक्के तूर ही लवकर येणारी आहे. तर ६० टक्के तूर उशीरा येणारी आहे. सध्या लकवर येणाºया तूरीच्या शेंगा परिपक्व झालेल्या आहेत. काही ठिकाणी तर शेंगा वाळण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे अशा तूरीला धुक्याचा परिणाम जाणवत नाही. मात्र उशीरा येणाºया तूर पिकावर धुक्याचे मोठे संकट निर्माण झाले आहे. जिल्ह्यात सरासरी ६० टक्के तूर ही उशीरा येणारी आहे; जी तूर सध्या फळधारणेच्या अवस्थेत आहे. काही तूर शेंगानी बहरलेली आहे. परंतू गेल्या आठवड्यापासून दुसऱ्यांदा जिल्ह्यात धुक्याची लाट निर्माण झाली आहे. हे धुके उशीरा येणाºया तूर पिकासाठी मारक ठरत आहे. त्यामुळे फुलगळतीसोबतच तुरीच्या शेंगानाही नुकसानकारक ठरत आहे. अनेक तूरीच्या शेंगा काळ्या पडण्यास सुरूवात झाली आहे.
वाढल्यालेल्या धुक्याने व ढगाळ वातावरणाने तूर पीक धोक्यात सापडले आहे. त्यामध्ये शेंगा पोखरणाºया अळीचाही बहुतांश ठिकाणी प्रादुर्भाव जाणवत आहे.