भाऊसाहेब फुंडकर बळीराजा समृध्दी अभियानाचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2018 02:02 PM2018-09-09T14:02:30+5:302018-09-09T15:06:46+5:30
स्व. भाऊसाहेब फुंडकर बळीराजा समृद्धी अभियानाचा शुभारंभ शेगाव तालुक्यातील पहुरजिरा येथे ८ सप्टेंबर रोजी झाला.
खामगाव : भाऊसाहेबांना शेतकºयांविषयी विशेष प्रेम व आदर होता. त्यांच्या कार्यापासून प्रेरणा घेवूनच स्व. भाऊसाहेब फुंडकर बळीराजा समृद्धी अभियान राबवले जात आहे. आत्महत्याग्रस्त तणाव ग्रस्त, अल्पभूधारक शेतकºयांना अभियानात समाविष्ट करून घेण्यात आले आहे. लिंबू, पेरु व जांभूळ असे तीन रोपटे पाच हजार शेतकºयांना वितरीत केले जाणार आहेत. फळझाडा पासून कायम स्वरूपी उत्पन्न मिळेल अशी आशा आहे. त्यामुळे वाटण्यात आलेले झाड हे भाऊसाहेबांची स्मृती म्हणून लाभार्थी शेतकरी कुटुंबांनी जगवावे असे आवाहन भाजपा सोशल मिडीया महाराष्ट्रचे सदस्य तथा वसुंधरा बहुउददेशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सागर फुंडकर यांनी केले.
महाराष्ट्राचे माजी कृषी व फलोत्पादन मंत्री स्व. भाऊसाहेब फुंडकर यांच्या जयंतीनिमीत्य भारतीय जनता पार्टी खामगांव मतदार संघ व वसुंधरा बहुउददेशीय सामाजिक संस्था खामगावच्यावतीने आयोजीत स्व. भाऊसाहेब फुंडकर बळीराजा समृद्धी अभियानाचा शुभारंभ शेगाव तालुक्यातील पहुरजिरा येथे ८ सप्टेंबर रोजी झाला. पहिल्याच दिवशी २ हजार फळवर्गीय रोपट्यांचे वितरण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. खामगांव मतदार संघातील आत्महत्याग्रस्त, तनावग्रस्त व अल्पभुधारक शेतकरी यांना फळझाड वाटप करण्याच्या लोकनेते स्व.भाऊसाहेब फुंडकर बळीराजा समृध्दी अभियानास पहूरजीरा गावापासून सुरुवात झाली. भाजपा सोशल मिडीया महाराष्ट्रचे सदस्य तथा वसुंधरा बहुउददेशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सागर फुंडकर यांनी शेतकºयांना फळवर्गीय रोपट्यांचे वितरण केले. या कार्यक्रमाला जि.प.सदस्या सौ स्वातीताई देवचे, कृषी उत्पन्न बाजार सभापती गोविंदराव मिरगे, जिल्हा सरचिटणीस संतोषराव देशमुख, जिल्हा महिला आघाडीच्या अनिताताई देशपांडे तालुकाध्यक्ष राजेंद्र देवचे, खामगांव तालुकाध्यक्ष शरदचंद्र गायकी, तालुका सरचिटणीस एकनाथ पाटील, माणिक भाऊ लाड,आदितीताई गोडबोले, पांडुरंग सावरकर, प्रमोद वडोदे यांची प्रमुख उपस्थिती होती. शेगांव तालुक्यात १२ सप्टेंबर पर्यंत फळझाड वाटपाचा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. त्यानंतर खामगांव तालुक्यात १४ सप्टेंबर पासून सुरुवात होईल. (प्रतिनिधी)