बीबी येथील ग्रामीण रुग्णालयात कोरोना लसीकरणाचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 05:02 AM2021-03-13T05:02:53+5:302021-03-13T05:02:53+5:30
बीबी येथील ग्रामीण रुग्णालयात परिसरातील नागरिकांच्या सेवेसाठी कोरोना लसीकरण व्हावे, यासाठी आरोग्य विभागाने स्थानिक ग्रामीण रुग्णालयात कोरोना लसीकरणाला सुरूवात ...
बीबी येथील ग्रामीण रुग्णालयात परिसरातील नागरिकांच्या सेवेसाठी कोरोना लसीकरण व्हावे, यासाठी आरोग्य विभागाने स्थानिक ग्रामीण रुग्णालयात कोरोना लसीकरणाला सुरूवात केली आहे. शिवनी पिसा येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी नागरे यांच्या हस्ते फीत कापून शुभारंभ करण्यात आला. बीबी येथीलच ज्येष्ठ नागरिक पी. पवार यांना प्रथम लस ज्योती राठोड यांनी देऊन लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. बीबी ग्रामीण रुग्णालयात २० ते २५ गावांचे रुग्ण उपचारासाठी येत असल्यामुळे बीबी ग्रामीण रुग्णालयातच लसीकरण व्हावे, अशी मागणी नागरिकांमधून होत होती. यावेळी बीबी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रतीक सुराणा यांनी लसीकरण केंद्राच्या कार्यप्रणालीचे अवलोकन करून संबंधित यंत्रणेला महत्त्वाच्या सूचना दिल्या. जनतेने लसीकरण करून घेण्याचे आवाहन केले. लसीकरण आठवड्यातून सोमवार, बुधवार आणि शुक्रवार तीन दिवस होणार असल्याचे सांगितले. पहिल्या दिवशी हेल्थ केअर वर्कर चार, फ्रन्टलाइन वर्कर नऊ, तर ज्येष्ठ नागरिक ४३ यासह विकार असलेले दोन, प्रथम डोस ४७, द्वितीय डोस ११, असे एकूण ५८ जणांनी डोस घेतला. यावेळी डॉ. नाईक वैद्यकीय अधिकारी, डॉ. विशाल इंगोले, डॉ. विवेक बंगाळे, प्रभाकर चव्हाण, रुग्णालयाच्या अधिपरिचारिका शिंपणे, अश्विनी डोंगरदिवे, अतुल घोडके, कृष्णा पंदे, पंडित चव्हाण, किशोर खरात, प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी, कर्मचारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा स्वयंसेविका, ग्रामस्थ यांनी नियमांचे लसीकरण राबविले.