राहेरी येथील प्राथमिक शाळेत ई- लर्निंग कक्षाचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2016 01:23 AM2016-08-30T01:23:01+5:302016-08-30T01:23:01+5:30
गावक-यांनी लोकवर्गणीतून घेतला ई-लर्निंगचा संच.
राहेरी(जि. बुलडाणा), दि. २९: प्राथमिक शाळेतील शुक्रवारी आ. डॉ. शशिकांत खेडेकर यांच्या हस्ते ई-लर्निंग कक्षाचा शुभारंभ करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष जि.प. सदस्य विनोद वाघ होते. प्रमुख अतिथी म्हणून ठाणेदार सेवानंद वानखेडे, तालुका प्रमुख बाळु काळे होते. विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण देण्याचा मानस येथील नागरिक वीरेंद्र देशमुख यांनी गावकर्यांच्या समोर व्यक्त केला. गावकर्यांनीसुद्धा त्याला प्रतिसाद देऊन लोकवर्गणीतून ग्रामपंचायतीला ई-लर्निंगचा संच विकत घेऊन दिला, तर तंटामुक्त निधीतून ग्रामपंचायतीने ३0 हजार रुपये देऊन संच आणण्यात आला. यावेळी अनेक मान्यवरांनी मार्गदर्शन केले. आधुनिक तंत्रज्ञानाबरोबरच विद्यार्थ्यांंचा बौद्धिक वाढ होणेसुद्धा आवश्यक असल्याचे आ. डॉ. शशिकांत खेडेकर यांनी सांगितले.
ठाणेदार वानखेडे म्हणाले की, विद्यार्थी व पालक या दोघांमध्ये अभ्यासाबद्दल सुसंवाद असला पाहिजे. आपला मुलगा काय करतो, वर्गात काय शिकतो, याकडे प्रत्येक पालकाचे लक्ष असले पाहिजे, त्यामुळे पाल्यावर वचक राहतो. यावेळी कार्यक्रमास सरपंच मालतीबाई देशमुख, उपसरपंच ज्योती देशमुख, बाळाराम केवट, शिवाजी देशमुख, बालाप्रसाद फलटनकर, आनंद देशमुख, भीमराव गवई, तंटामुक्तीचे अध्यक्ष सुभाषराव देशमुख, समाधान गवई, बबन गवई, मधुकर मगर, मदन देशमुख, बालाजी देशमुख, धनंजय देशमुख, नितीन गवई, सज्रेराव अवसरमोल, पांडुरंग अवसरमोल, गुलाब डोंगरदिवे, शिवाजी लहाने, गजानन देशमुख उपस्थित होते.