चिखलीत टेलीमेडिसीन पद्धतीच्या उपचाराचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:25 AM2021-05-28T04:25:33+5:302021-05-28T04:25:33+5:30
प्रारंभी राहुल बोंद्रे यांनी आपल्या प्रास्ताविकात रूग्णसेवा हीच ईश्वर सेवा आहे हे ब्रीद मानून कर्मयोगी तात्यासाहेब बोंद्रे यांच्या रूग्णसेवेचा ...
प्रारंभी राहुल बोंद्रे यांनी आपल्या प्रास्ताविकात रूग्णसेवा हीच ईश्वर सेवा आहे हे ब्रीद मानून कर्मयोगी तात्यासाहेब बोंद्रे यांच्या रूग्णसेवेचा घेतलेला वसा समर्थपणे अखंडित सुरू रहावा तसेच जगभर कोविड या आजाराची भीषणता बघता ग्रामीण भागातील रूग्णांना कोरोना आजारावर औषधोपचार करून तो बरा व्हावा या दृष्टिकोनातून कर्मयोगी तात्यासाहेब बोंद्रे कोविड सेंटर व लोकसहभागातून ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प हाती घेतला असल्याचे सांगितले. डॉ. आनंद निकाळजे यांनी ग्रामीण भागामध्ये अत्याधुनिक सोयींनी उपयुक्त असे कर्मयोगी तात्यासाहेब बोंद्रे डेडिकेटेड सेंटरची उभारणी करून गोरगरीब कोविड रूग्णांच्या सेवाकार्याचे कौतुक केले. यावेळी संस्थेचे विश्वस्त सिद्धेश्वर वानेरे, दीपक देशमाने, प्राचार्य डॉ.नन्हई, प्राचार्य डॉ. के.आर.बियाणी, प्राचार्य आर.एच.काळे, प्राचार्य डॉ.आर.आर.पागोरे, डॉ. मंगेश मिसाळ, डॉ. मोरे, डॉ. गोसावी, डॉ. संजय घुगे उपस्थित होते. संचालन प्रा. जोशी यांनी केले