‘राष्ट्रीय ग्रामीण पेयजल व स्वच्छता जागृती सप्ताह’ शुभारंभ
By admin | Published: March 17, 2015 12:57 AM2015-03-17T00:57:31+5:302015-03-17T00:57:31+5:30
बुलडाणा जिल्ह्यात १६ ते २२ मार्चदरम्यान राष्ट्रीय ग्रामीण पेयजल व स्वच्छता जागृती सप्ताह.
बुलडाणा : जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षांतर्गत जिल्ह्यात १६ ते २२ मार्चदरम्यान राष्ट्रीय ग्रामीण पेयजल व स्वच्छता जागृती सप्ताह राबविण्यात येत आहे. या सप्ताहाचा शुभारंभ १६ मार्च रोजी जिल्हा परिषद आवारात विद्यार्थ्यांच्या सायकल रॅलीने सुरुवात झाली.
याप्रसंगी जि.प. अध्यक्ष अलकाताई खंडारे, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपा मुधोळ, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता दीपक वाघ, शिक्षणाधिकारी प्राथमिक वैशाली ठग यांनी रॅलीस हिरवी झेंडी दाखवून सुरुवात करण्यात आली. याप्रमाणे संपूर्ण १३ पंचायत समितीस्तरावरसुद्धा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
या सप्ताहात जिल्हास्तर, तालुकास्तर, ग्रामपंचायत स्तरावर जाणीव जागृतीपर विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे. या अभियानासाठी जिल्ह्याच्या वार्षिक कृती आराखड्यात निवडण्यात आलेल्या २२0 ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली आहे.
सदर सप्ताहाच्या कालावधीत प्रत्येक कुटुंबाने पाण्याच्या योग्य वापरासह शौचालय बांधून वापराचा संकल्प करून निरोगी आरोग्य जगण्याचा संकल्प करावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष अलकाताई खंडारे व उपाध्यक्ष पांडुरंग खेडेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपा मुधोळ यांनी केले आहे.