सप्तशृंगी महिला अर्बनच्या नवव्या शाखेचा मेहकरात शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:46 AM2021-06-16T04:46:37+5:302021-06-16T04:46:37+5:30
सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर तसेच शहीद जवानांच्या कुटुंबाला मदत करणाऱ्या या बँकेची ही नववी शाखा मेहकर परिसरातील गरजूंना व ...
सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर तसेच शहीद जवानांच्या कुटुंबाला मदत करणाऱ्या या बँकेची ही नववी शाखा मेहकर परिसरातील गरजूंना व महिलांना आर्थिक सहकार्य करण्यासाठी वेळोवेळी तत्पर राहून कार्य करील, असे मत बँकेचे संस्थापक अध्यक्ष देवानंद पवार यांनी व्यक्त केले. या बँकेच्या शुभारंभ निमित्ताने आज माजी नगराध्यक्ष संजय जाधव, युवा सेना जिल्हा युवा अधिकारी ऋषी जाधव, तालुकाप्रमुख सुरेश वाळूकर, जिल्हा परिषद सदस्य आशिष रहाटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गजानन सावंत, शहर अध्यक्ष निसार अन्सारी, जिल्हा परिषद सदस्य संतोष चनखोरे, ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रमोद देशमुख, कार्यकारी संचालक भूषण देशमुख, प्रा. परमानंद गारोळे, भूषण मापारी, सचिन शिंदे, काँग्रेसचे मेहकर मतदारसंघ नेते ॲड. अनंत वानखेडे, भीमशक्तीचे कैलास सुगदाने, नगरसेवक विकास जोशी, माजी नगराध्यक्ष विलास चनखोरे, माजी नगरसेवक अनिल शर्मा, सरपंच गजानन चनेवार, भाजप तालुका अध्यक्ष ॲड. शिव पाटील ठाकरे, महेश अर्बनचे अध्यक्ष गोपाल मोदाणी, गजेंद्र माने, उदय सावजी, उदय सोनी, अशोक इंन्नानी, माजी सभापती रमेश धोंडगे, शिवसेनेचे खंडूभाऊ सवडतकर, शेरूभाई कुरेशी, प्रा. गजानन गारोळे, पत्रकार सिध्देश्वर पवार, ओमप्रकाश देवकर, रफीक कुरेशी, प्रशांत काळे, प्रदीप शेळके, रवींद्र शेळके, रमेश घुमरे, दिलीप खरात, कृष्णा हावरे, अमर राऊत, गजानन दुतोंडे, सय्यद महेबूब, जयदीप देशमुख, ॲड. शैलेश देशमुख, जितू अडेलकर, सुभाष नाहटा, यासिन कुरेशी, जुबेर कुरेशी, ॲड. पाखरे, भारत शेळके, रमेश खरात, सरपंच संगीता खरात, प्रकाश राठोड, श्रीराम राठोड, अमोल धोटे, शाम देवकर, युसूफ शेखसह अनेकांनी भेटी दिल्या. यावेळी संस्थापक उपाध्यक्ष विष्णू वाकळे, बँकेच्या अध्यक्षा गीता देवानंद पवार, उपाध्यक्षा संगीता विष्णू वाकळे, व्यवस्थापक सुभाष खरात, संचालक राजू देवकर, श्रीराम पवार, मनीष धोटे, रत्नाकर गवारे, नामदेव राठोड, मनोहर रोडगे, तुकाराम चव्हाण, माधव ससाणे, दत्ता गायकवाड, संजय रसाळ, राजेंद्र शिंदे, नितीन मोसंबेसह सर्व कर्मचारी उपस्थित होते.(वा़ प्र)