देऊळगाव कुंडपाळ येथे पोषण मास उपक्रमाचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:41 AM2021-09-04T04:41:05+5:302021-09-04T04:41:05+5:30
यावेळी सरपंच शेषराव डोंगरे, उपसरपंच विष्णू सरकटे, भागवत जायभाये, लक्ष्मण गाढवे, गणेश गाढवे, बाळासाहेब डोंगरे, अंगणवाडी सेविका उषा सरकटे, ...
यावेळी सरपंच शेषराव डोंगरे, उपसरपंच विष्णू सरकटे, भागवत जायभाये, लक्ष्मण गाढवे, गणेश गाढवे, बाळासाहेब डोंगरे, अंगणवाडी सेविका उषा सरकटे, शालू राठोड, कुसुम इंगळे, मदतनीस संगीता राठोड, कुसुम डोगरे, मीना खरात, आशा सेविका शीतल वायाळ, सिधू इंगळे यांची उपस्थिती होती. या उपक्रमांतर्गत संपूर्ण सप्टेंबर महिन्यांत विविध कार्यक्रमांच्या आयोजनाचे नियोजन गावपातळीवर स्थानिक तीनही अंगणवाडी केंद्राकडून करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमांतर्गत मुलींच्या जन्माचे स्वागत, कोविड-१९ लसीकरण व स्वच्छता जणजागृती, गरोदर माता समुपदेशन, माझे मुले माझी जबाबदारी, माता व बालकांची आरोग्य तपासणी, आहाराबाबत मार्गदर्शन, समुदाय आधारित कार्यक्रम, रानभाज्या प्रदर्शन, कमी वजनाच्या बालकाच्या गृहभेटी, बेटी बचाव बेटी पढाव, किशोरी मुलीना मार्गदर्शन, यशोगाथा यासह दैनंदिन विविध उपक्रम राबविण्यात येणार असून, तसे नियोजन व आयोजन बाल विकास प्रकल्प अधिकारी अश्विनी ठाकरे, पर्यवेक्षिका भिकाबाई सानप यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्तरावर करण्यात आलेले आहे.