लोणारात न्यूमोनिया प्रतिबंध लसीकरणाचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:24 AM2021-07-15T04:24:04+5:302021-07-15T04:24:04+5:30
लोणार तालुक्यात लसीकरणाचा शुभारंभ गुंजखेड येथील उपकेंद्रात तालुका आरोग्य अधिकारी किसन राठोड याच्या हस्ते करण्यात आला. बाळ जन्मल्यानंतर ...
लोणार तालुक्यात लसीकरणाचा शुभारंभ गुंजखेड येथील उपकेंद्रात तालुका आरोग्य अधिकारी किसन राठोड याच्या हस्ते करण्यात आला.
बाळ जन्मल्यानंतर ६ आठवडे , साडेतीन महिने व ९ महिने अशा अंतराने हे लसीकरण केले जाणार आहे. सध्या जे नियमित लसीकरण लहान बाळांसाठी सुरू आहे. लसीकरण कार्यक्रमात या लसीकरणाचाही समावेश करण्यात आल्याने पालकांसाठी चांगली सुविधा निर्माण झाली आहे .‘स्टॅफायलोकोकल न्यूमोनी’ या जीवाणूमुळे न्यूमोकोकल न्यूमोनिया हा आजार होत असतो. लहान मुलांना हा आजार झाल्यास त्यांना तीव्र न्यूमोनिया होऊन जीविताला धोका निर्माण होतो. हा आजार टाळण्यासाठी आतापर्यंत खासगी दवाखान्यात हे लसीकरण केले जात होते. पण या लसीची किंमत सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असल्याने बऱ्याच बाळांना ही लस मिळत नव्हती. या बाबीची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने सर्व नवजात बालकांना हीलस मोफत उपलब्ध करून दिली आहे. जनतेने आपल्या जवळच्या आरोग्य केंद्रावर, ग्रामीण रुग्णालयाशी संपर्क करून आपल्या बाळाचे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन डॉ. किसन राठोड यांनी केले आहे. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रल्हाद जायभाये, गुंजखेड उपकेंद्राचे वैद्यकीय अधिकारी, आशा सेविका व परिचारिका उपस्थित हाेत्या.