शिकाऊ चालक परवाना ऑनलाइन काढण्याची प्रणाली सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:23 AM2021-06-19T04:23:27+5:302021-06-19T04:23:27+5:30

केंद्रीय मोटार वाहन नियम ११ अन्वये, शिकाऊ अनुज्ञप्तीसाठी अर्ज करताना उमेदवारास केंद्र शासनाने विहित केलेली परीक्षा देणे अनिवार्य आहे. ...

Launcher driver license online removal system launched | शिकाऊ चालक परवाना ऑनलाइन काढण्याची प्रणाली सुरू

शिकाऊ चालक परवाना ऑनलाइन काढण्याची प्रणाली सुरू

Next

केंद्रीय मोटार वाहन नियम ११ अन्वये, शिकाऊ अनुज्ञप्तीसाठी अर्ज करताना उमेदवारास केंद्र शासनाने विहित केलेली परीक्षा देणे अनिवार्य आहे. अर्जदारास वाहतूक नियम चिन्हांचे व वाहन चालकाच्या जबाबदारीचे महत्त्व याची माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. यामुळे जबाबदार वाहनचालक निर्माण होण्यास मदत होते. या प्रणालीचा वापर करतेवेळी पालकांनी त्यांच्या पाल्यास परीक्षेचे महत्त्व पटवून द्यावे, तसेच या प्रणालीचा गैरवापर होणार नाही, याची जाणीव करून देणे आवश्यक आहे. या लोकाभिमुख सोयीसुविधांचा गैरवापर होणार नाही, यासाठी प्रणालीमध्ये आवश्यक त्या सुधारणा यथास्थिती करण्यात येत आहेत. तथापि, सध्या उपलब्ध असलेल्या ऑनलाइन सुविधांचा गैरवापर करणाऱ्या अर्जदार, संबंधित मध्यस्थ, अनधिकृत व्यक्ती यांच्यावर आवश्यक ती पोलीस कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

गैरप्रकार केल्यास कायमस्वरूपी परवाना अपात्र

ऑनलाइन प्रणालीमध्ये गैरप्रकार होण्याचा धोका संभवतो. त्यामुळे या प्रकरणी दोषी ठरलेला अर्जदार हा मोटार वाहन कायदा, कलम १९ (इ) अन्वये परवाना धारण करण्यास कायमस्वरूपी अपात्र ठरेल, अशी कारवाई करण्याच्या सूचना संबंधित प्रादेशिक परिवहन अधिकारी व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांना मिळाल्या आहेत.

Web Title: Launcher driver license online removal system launched

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.