अघोरी प्रथांपासून परावृत्त करण्यासाठी कायदा
By admin | Published: November 14, 2014 12:02 AM2014-11-14T00:02:28+5:302014-11-14T00:02:28+5:30
बुलडाणा येथे श्याम मानव यांचे जादूटोणा विरोधी कायदावर प्रबोधन.
बुलडाणा : समाजातील सर्वसामान्य लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन लोकांचे आर्थिक, मानसिक व शारीरिक शोषण करणात्या घटकांना ते करण्यापासून परावृत्त करणे आणि अलौकिक शक्ती, भूत पिशाच्च यांच्या नावावर चालणार्या नरबळी व इतर अनिष्ट व अघोरी प्रथांपासून लोकांना परावृत्त करणे या उद्देशाने हा कायदा तयार करण्यात आला आहे. केवळ कायदा तोडणार्या लोकांना शिक्षा करणे, त्यांना जेलमध्ये टाकणे हा या कायद्याचा हेतू नाही तर अशा गोष्टींना प्र ितबंध करणे, ज्यामुळे लोकांचे जीव वाचतील, त्यांची शारीरिक , मानसिक व आर्थिक हानी टळेल, हा या कायदयाचा खरा हेतू असल्याचे पीआयएमसीचे सहअध्यक्ष श्याम मानव यांनी स्पष्ट केले. जिजामाता प्रेक्षागारमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आणि जादूटोणा कायदा व चम त्कार, भूत , तंत्र-मंत्र ,जादूटोणा किती खरं किती खोटं, याबाबत श्याम मानव यांनी चमत्कार प्रात्यक्षिकासह व्याख्यान दिले. समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या व्याख्याना प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी चिंतामणी जोशी यांनी केले.