खामगावातून बॅग लंपास करणाऱ्यांना एलसीबी पथकाने केले जेरबंद, सात जण फरार

By अनिल गवई | Published: March 20, 2023 07:25 PM2023-03-20T19:25:51+5:302023-03-20T19:26:02+5:30

वाहनात आढळले दरोडा टाकण्याचे साहित्य

LCB team arrested those who looted bags from Khamgaon, seven absconded | खामगावातून बॅग लंपास करणाऱ्यांना एलसीबी पथकाने केले जेरबंद, सात जण फरार

खामगावातून बॅग लंपास करणाऱ्यांना एलसीबी पथकाने केले जेरबंद, सात जण फरार

googlenewsNext

खामगाव: येथील गांधी चौकातून एका दुचाकीच्या डिक्कीतून ६ लाखाची बॅग लंपास करणाऱ्या गुजरातमधील एका गँगचा पोलिसांनी पर्दाफाश केला. तपासादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शेगाव-बाळापूर रोडवरील एका शेतात दरोड्याचा कट रचत असलेल्या या टोळीतील तिघांना बेडया ठोकल्या असून, त्यांच्या ताब्यातून एका आलीशान कारसह, एक मोटारसायकल आणि दरोडा टाकण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे. दरम्यान, पोलिस आल्याचे समजतात छर्रा गॅग नावाने प्रसिध्द असलेल्या टोळीतील सात जण फरार झाले आहेत.

खामगाव शहरातील गांधी चौकातून १६ मार्च रोजी एका दुचाकीच्या डिक्कीतून ६ लाखाची बॅग लंपास करण्यात आली. चोरी करणारे भामटे सिसी कॅमेऱ्यात कैद झाले. त्या आधारे पोलिसांनी तांत्रिक बाबी तपासून चोरट्यांच्या शोधासाठी वेगवेगळे पथक तयार केले होते. दरम्यान रविवारी स्थानिक गुन्हे शाखा बुलढाण्याचे पथक शेगावातील लॉजेस व हॉटेलची तपासणी करीत असतांना शेगाव- बाळापूर रोडवरील एका शेतात आलीशान कारसह, दुचाकी असलेले काही जण अंधारात थांबल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली.या गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केली.

यात सात जण घटनास्थळावरून फरार झाले तर पोलिसांनी यावेळी अजयकुमार अशोकभाई तमचे (४२), जिगनेश दिनेश घासी (४४), रितीक प्रविण बारंगे (२३) सर्व रा. अहमदनगर गुजरात यांना पकडले. त्यांच्याकडून तवेरा (क्र. जीजे १ डीए६८८२) गाडी जप्त केली. या गाडीची झडती घेतली असता त्यात मोटर सायकलवर बनावट नंबर बनविण्यासाठी लागणारे साहित्य रेडीयम ०स्टिक र वाहनाचे लाक तोडण्यासाठी अनुकुचीतदार टी, दोन चाकू, चार पेचकस, एक कैची, मिरची पावडर यासह नगदी ८५ हजार रु., एक मोटारसायकल, एक मोबाईल असे साहित्य जप्त केले.

खामगावातील ६ लाखाच्या बॅग चोरीची कबूली
चोरट्यांनी खामगावातील चोरीची कबुली दिली. ही कारवाई जिल्हा पोलिस अधिक्षक सारंग आवाड, अप्पर पोलिस अधिक्षक अशोक थोरात, डिवायएसपी अमोल कोळी, एलसीबीचे पोलिस निरीक्षक अशोक लांडे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलिस अमलदार गणेश किनगे, केदार फाळके, अजिस परसुवाले, मधुकर रगड, गणेश पाटील, पुरुषोत्तम अघाव, वैभव मगर, विजय सोनुने, सुरेश भिसे यांनी केली.

Web Title: LCB team arrested those who looted bags from Khamgaon, seven absconded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.