तरवाडी गावातही मराठा आरक्षण मिळेपर्यंत नेत्यांना प्रवेशबंदी
By सदानंद सिरसाट | Updated: October 27, 2023 17:34 IST2023-10-27T17:33:32+5:302023-10-27T17:34:36+5:30
सध्या महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे.

तरवाडी गावातही मराठा आरक्षण मिळेपर्यंत नेत्यांना प्रवेशबंदी
वसाडी, नांदुरा (बुलढाणा) : नांदुरा तालुक्यातील गट ग्रामपंचायत तरवाडी येथे ग्रामपंचायतीच्या सभेत उपस्थित सर्वांनीच गुरूवारी मराठा आरक्षण मिळेपर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्याला गावात प्रवेशबंदी करण्याचा ठराव घेतला आहे. त्यामुळे असा ठराव घेणारी तरवाडी ग्रामपंचायत जिल्ह्यात प्रथम ठरली आहे.
सध्या महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. राज्यातील अनेक गावांत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत राजकीय नेत्यांना गावबंदी करण्याचा ठराव घेणे सुरू आहे. बुलढाणा जिल्ह्यातही हा ठराव घेणारी तरवाडी गट ग्रामपंचायत ही पहिलीच ठरली आहे.