आर्थिक साक्षरतेवर अग्रणी बँकेचा जोर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:32 AM2021-02-12T04:32:25+5:302021-02-12T04:32:25+5:30
या वर्षी प्रामुख्याने स्मार्ट बना, सुज्ञ बना आणि जबाबदार बना, या तीन मुद्द्यांचा प्रचार केला जात आहे. त्या अनुषंगाने ...
या वर्षी प्रामुख्याने स्मार्ट बना, सुज्ञ बना आणि जबाबदार बना, या तीन मुद्द्यांचा प्रचार केला जात आहे. त्या अनुषंगाने नागरिकांनी गरज असल्यास अधिकृत संस्थांकडून कर्ज घ्यावे, कर्ज घेतानाही तेवढेच कर्ज घ्या, जेवढे आपण फेडू शकतो, सोबतच कर्ज हप्ता आणि देय रक्कम ही वेळेत भरा, त्यामुळे बँकांमधील आपली पत वाढण्यास मदत होते. हे मुद्दे घेऊन ग्रामीण भागात अग्रणी बँकेच्या माध्यमातून या सप्ताहांतर्गत जागृती करण्यात येत असल्याचे अग्रणी बँकेचे व्यवस्थापक नरेश हेडाऊ यांनी सांगितले. ८ ते १२ फेब्रुवारीच्या दरम्यान हा आर्थिक साक्षरता सप्ताह राबविण्यात येत असल्याचे ते म्हणाले. यासोबतच गेल्या वर्षी या सप्ताहामध्ये आरबीआयने डिजिटल बँकिंग हा विषय घेऊन जनजागृती केली होती. त्यामुळे डिजिटल बँकिंगला एक मोठे प्रोत्साहन मिळाले होते. आज १२ फेब्रुवारी रोजी या आर्थिक सप्ताहाचा समारोप होत आहे.