लिकेज पाईपलाईनमधून पाण्याची गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:43 AM2021-02-25T04:43:13+5:302021-02-25T04:43:13+5:30

शेतीचे साहित्य लंपास करणारी टाेळी सक्रिय किनगाव राजा : परिसरात सध्या भुरट्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून चोरटे गावाबरोबर शेतातील ...

Leakage of water from the leakage pipeline | लिकेज पाईपलाईनमधून पाण्याची गळती

लिकेज पाईपलाईनमधून पाण्याची गळती

Next

शेतीचे साहित्य लंपास करणारी टाेळी सक्रिय

किनगाव राजा : परिसरात सध्या भुरट्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून चोरटे गावाबरोबर शेतातील साहित्याकडेही लक्ष केंद्रित करीत आहेत. मागील आठवड्यात शेतातून चोरट्यांनी स्प्रिंकलरच्या तोट्या चोरून नेल्या होत्या. त्यामुळे परिसरात पुन्हा एकदा चोरटे सक्रिय झाले असून रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी गावकऱ्यांकडून होत आहे.

सैलानीची यात्रा रद्द झाल्याने भाविकांचा हिरमाेड

बुलडाणा : हिंदू-मुस्लिमांच्या एकतेचे प्रतीक असलेली बुलडाणा जिल्ह्यातील पिंपळगाव सराई येथे दरवर्षी भरणारी सैलानी यात्रा कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सलग दुसऱ्या वर्षीही रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे भाविकांचा हिरमाेड झाला आहे.

ग्रामीण रुग्णालय सुरू हाेण्याची प्रतीक्षा

हिवराआश्रम : येथे ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, रुग्णालयाचे कामकाज सुरू झालेले नाही. सध्या परिसरात काेराेना रुग्णांची संख्या वाढत असल्याने ग्रामीण रुग्णालय सुरू करण्याची मागणी हाेत आहे.

Web Title: Leakage of water from the leakage pipeline

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.