ग्रामीण भागात बसेस वेळेवर सोडाव्यात

By admin | Published: July 9, 2017 02:12 PM2017-07-09T14:12:44+5:302017-07-09T14:12:44+5:30

बुलडाणा आगारातून अनेक बसेस ठरलेल्या वेळेत सोडल्या जात नाही.

Leave the buses in the rural areas in a timely manner | ग्रामीण भागात बसेस वेळेवर सोडाव्यात

ग्रामीण भागात बसेस वेळेवर सोडाव्यात

Next

बुलडाणा : बसस्थानक हे जिल्ह्याचे मुख्य बसस्थानक असल्याने येथे दररोज
हजारो प्रवाशांची वर्दळ असते. तसेच ग्रामीण भागातून बुलडाणा येथे
शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मात्र
असे असतांनाही बुलडाणा आगारातून अनेक बसेस ठरलेल्या वेळेत सोडल्या जात
नाही. त्यामुळे प्रवाशी आणि विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात मानसिक
त्रास सहन करावा लागत आहे.
२ जुलै रोजी सकाळी ६ वाजता सुटणारी चांडोळ ही बस चालक हजर नसल्याने
पयार्यी चालक बस घेवून ७ ते ७.१५ वाजता निघाली मात्र या बसमध्ये प्रवाशी
नव्हते. तर मढ मार्गे धाड आणि जामठी मार्गे धाड बस आज ५ जुलै रोजी गेलीच
नाही. या दोन बसेस शाळांना सुट्टी असलेल्या दिवशी जात नसल्याने सकाळी
तेथून येणाऱ्या प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. तसेच बसस्थानकावर
सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून, चिडीमारीचे
प्रकारही वाढले आहेत. सोयगाव आगाराची अकोला-सोयगाव ही बस सायंकाळी ६.१५
वाजता जाते. त्यामुळे प्रवाशी निघून जातात परिणामी सायंकाळी ६.३० वाजता
मुक्कामी जाणारी बुलडाणा-अजिंठा गाडीला प्रवाशी मिळत नसून अर्निंग सुध्दा
मिळत नाही. त्यामुळे मुक्कामी जाणारी बुलडाणा-अजिंठा या गाडीची वेळ
बदलवून ती सायंकाळी ७.३० ते ८ वाजता करावी जेणेकरुन प्रवाशांना सोयीचे
होईल, अशी प्रवाशी वर्गाकडून मागणी होत आहे.

Web Title: Leave the buses in the rural areas in a timely manner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.