राजवाड्यामधून भास्करराव शिंगणे यांची स्मृतिज्योत बुलडाण्याकडे रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2017 12:21 AM2017-10-12T00:21:59+5:302017-10-12T00:22:01+5:30
सिंदखेडराजा : सहकार महर्षी स्व.भास्करराव शिंगणे यांच्या स्मृतिदिनानिमित्त येथील राजवाड्यातून ११ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजता स्मृतिज्योत निघाली. राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांना अभिवादन करून व स्व.भास्करराव शिंगणे यांच्या प्रतिमेला पुष्पगुच्छ वाहून आदरांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर ही स्मृतिज्योत बुलडाणा येथे रवाना झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क

यावेळी नगर अध्यक्ष अँड.नाझेर काझी यांनी भास्करराव शिंगणे यांनी केलेल्या कार्याचा गौरव करून त्यांनी केलेले कार्य पुढील पिढीला प्रेरणादायी ठरणार असल्याचे मत मार्गदर्शनामधून व्यक्त केले. यावेळी स्मृतिज्योत आयोजन समितीचे हिंमतराव पाटील, जगन्नाथ बोरकर, डॉ.निकम, भास्कर पाटील, बबनराव म्हस्के राजेशआप्पा बोंद्रे, डॉ.भरत मेहेर, महेश पवार, गंगाधर कुंडकर, देवीदास ठाकरे, देऊळगाव राजा पं.स.सभापती रजनीताई चित्ते, गंगाधर जाधव, सीताराम चौधरी, शिवाजी राजे जाधव, जगन सहाने, जगन ठाकरे, प्रकाश कुहिरे, महेश जाधव, डॉ.मुरलीधर शेवाळे, जिल्हा केंद्रीय सहकारी बँक विकास अधिकारी ए.बी.पवार, वामनराव पवार, मुख्याध्यापिका शकुंतला देशमुख, डॉ.सविता बुरकुल, प्रकाश मेहेर, राजेश अंभोरे, संजय उगले, राष्ट्रमाता जिजाऊ विद्यालयाचे शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.