बिबट्याच्या हल्ल्यात घोडीसह शिंगरु ठार

By admin | Published: March 9, 2017 01:39 AM2017-03-09T01:39:49+5:302017-03-09T01:39:49+5:30

घाटबोरी वनपरिक्षेत्रात बिबट्याचा मुक्त संचार.

In the leopard attack, the coffin with the horse is killed | बिबट्याच्या हल्ल्यात घोडीसह शिंगरु ठार

बिबट्याच्या हल्ल्यात घोडीसह शिंगरु ठार

Next

डोणगाव(जि. बुलडाणा), दि. ८- घाटबोरी वनपरिक्षेत्रात असलेल्या मांडवा बिटमध्ये पाराशर शिवमंदिराजवळ डोणगाव येथील डॉ.सुभाष दत्तात्रय आंबेकर यांच्या मालकीच्या काठेवाडी घोडी व शिंगरु यांच्यावर बिबट्याने ६ मार्चला हल्ला करून त्यांचा जागीच फडशा पाडल्याची घटना घडली.
घाटबोरी वनपरिक्षेत्रात येणार्‍या पाथर्डीनजीक डोंगरात पाराशर शिवमंदिर असून, याठिकाणी अर्जुन खुळे यांचे शेत आहे. या शेतात सदर घोडी व शिंगरुला रात्रीच्या दरम्यान बिबट्याने हल्ला करून ठार केले. या बिबट्याला गावातील नागरिकांनी पाहिल्याचे समजते. वन विभागाच्या अधिकार्‍यांनी सदर घटनेचा पंचनामा केला असून, शिंगरुचे कोठेही अवशेष आढळून आले नाहीत. या घोडीची किंमत अंदाजे ७0 हजार रुपये आहे.

Web Title: In the leopard attack, the coffin with the horse is killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.