डोणगावमध्ये बिबट्याचे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:25 AM2021-06-05T04:25:29+5:302021-06-05T04:25:29+5:30
डोणगाव येथील लोणी गवळी शेत शिवारात समृद्धी महामार्गाजवळील दीपक कावले या शेतकऱ्यास ३ जूनच्या संध्याकाळी ७ वाजता दरम्यान शेतात ...
डोणगाव येथील लोणी गवळी शेत शिवारात समृद्धी महामार्गाजवळील दीपक कावले या शेतकऱ्यास ३ जूनच्या संध्याकाळी ७ वाजता दरम्यान शेतात जाताना बिबट्या दिसून आला. तेव्हा त्यांनी गावात फोन करून शिवारात बिबट्या आल्याची माहिती दिली. त्यामुळे अनेक जण शेतात आले. या शिवारातील शेतकऱ्यांच्याकडे दुभत्या म्हशी, गायी आहेत. हे सर्व गुरेढोरे शेतातच असतात. अशात बिबट्या आपल्या जनावरांवर हल्ला तर करणार नाही ना, या चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांनी व बिबट्या पाहण्याच्या कुतूहलाने कित्येकांनी मोटारसायकल घेऊन आंध्रुड शेत शिवार गाठले. पण त्यांना काही बिबट्या दिसलाच नाही. तर दुसरीकडे गॅस एजन्सी जवळील अय्युप मुल्लाजी यांच्या घराजवळ लोणी गवळी रस्त्याने गजानन आखाडे गुरुजी हे गोठ्यावर असताना रात्री १० वाजता दरम्यान कुत्र्यांच्या पाठीमागे बिबट्या लागला आणि सरळ आखाडे गुरुजींच्या गोठ्यावर पोचला मात्र कुत्रे पळत असल्याने नदीमधून तो गावाकडे जाताना दिसून आला.
मी गावाशेजारील आमच्या गोठ्यावर होतो तेव्हा कुत्र्याचा पाठलाग करताना बिबट्या सरळ गोठ्याजवळ आला आणि पुन्हा कुत्र्यांचा पाठलाग करत निघून गेला. हा बिबट्या जास्त मोठा नाही.
-गजानन आखाडे