शर्थीच्या प्रयत्नानंतर बिबट्याला मिळाले जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 05:02 AM2021-03-13T05:02:35+5:302021-03-13T05:02:35+5:30

घाटबोरी वनपरीक्षेत्रातंर्गत येत असलेल्या पाथर्डीच्या जंगालाला लागूनच बोथा शिवारात मनोहर बोराडे यांचे शेत आहे. या शेतातील विहीरीत बिबट्या पडला ...

The leopard was spared after a bet | शर्थीच्या प्रयत्नानंतर बिबट्याला मिळाले जीवदान

शर्थीच्या प्रयत्नानंतर बिबट्याला मिळाले जीवदान

Next

घाटबोरी वनपरीक्षेत्रातंर्गत येत असलेल्या पाथर्डीच्या जंगालाला लागूनच बोथा शिवारात मनोहर बोराडे यांचे शेत आहे. या शेतातील विहीरीत बिबट्या पडला असल्याची माहिती बोराडे यांना सायंकाळी शेतातून घरी जात असताना मिळाली. त्यानंतर स्थानिक शेतकऱ्यांच्या मदतीने ही माहिती वनपरीक्षेत्र अधिकारी प्रल्हाद तोंडीलायता तसेच वनपाल संदीप परिहार यांना देण्यात आली. त्यांनी तातडीने घटनास्थळ गाठले व बिबट्यास बाहेर काढण्यासाठी शेतकऱ्यांच्या मदतीने प्रयत्न केले. मात्र त्यात त्यांना फारसे यश आले नाही. त्यानंतर बुलडाणा येथून वन्य प्राणी बचाव दलास पाचारण करण्यात आले. त्यांनी लाकडी शिड्या एकमेकास जोडून शेतातील खोल विहीरीत सोडल्या. तेव्हा विहिरीच्या कपारीत असलेल्या बिबट्याने पहाटे २ वाजेच्या सुमारास या शिडीचा आधार घेत जंगलात धूम ठोकली. सेतकऱ्यांनी वेळीच वनविभागाला दिलेली माहिती व जिल्हा उप वनसंरक्षक अक्षय गजभिये यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक वनसरंक्षक संदीप गवारे, वनपरिक्षेत्र अधिकारी पी. आर. तोंडीलायता, वनपाल एस. डी. परिहार, एस. वाय. बोबडे, वन्य प्राणी बचाव दलाचे राहुल चव्हाण, वनरक्षक एस. आर. मांटे, वाहन चालक संदीप मडावी यांनी यासाठी मोठी मेहनत घेतली.

Web Title: The leopard was spared after a bet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.