बोरजवळा येथे बिबट्याचा धुमाकुळ, दोन गायींचा पाडला फडशा!
By अनिल गवई | Published: April 4, 2023 04:16 PM2023-04-04T16:16:54+5:302023-04-04T16:17:08+5:30
नागरिकांमध्ये दहशत: बैलगाडी चालणार्या कुत्र्यालाही नेले उचलून
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: जंगलातील पाण्याच्या तुटवड्यामुळे वन्यजीवांची नागरी वस्तीकडे धाव आहे. खामगाव तालुक्यातील बोरजवळा शिवारात गत काही दिवसांपासून बिबट्याचा धुमाकुळ वाढला असून, रविवारी एका बिबट्याने शेतकर्यांच्या दोन गायींचा फडशा पाडला. तर बैलगाडीसोबत चालणार्या एका कुत्र्यालाही मक्याच्या शेतात उचलून नेले. त्यामुळे बोरजवळा शिवारात बिबट्याची चांगलीच दहशत पसरली असून भीतीपोटी शेतमजुरांनी शेतात कामाला जाण्याचेही बंद केल्याची चर्चा आहे.
बोरजवळा शिवारातील रमेश मुर्हे, गणेश इंगळे यांच्या शेतात गत काही दिवसांपासून बिबट्या तळ ठोकून आले. चराईला जाणार्या जनावरांची शिकार करीत बिबट्या निर्जनस्थळी नेऊन ती जनावरे फस्त करतो. गत आठवड्यापासून िबबट्याचा हा नित्यक्रम झाल्याने शेतकर्यांसोबतच शेत मजूरांनीही शेतात जाणे बंद केले आहे. रविवारी बिबट्याने गावातील दोन शेतकर्यांच्या दोन गायी फ स्त केल्या. तर बैलजोडी सोबत घरी जाणार्या एका शेतकर्याचा एक कुत्राही बिबट्याने उचलून नेला. यावेळी बालंबाल बचावलेला शेतकरी चांगलाच भेदरला आहे. बिबट्याच्या वाढत्या दहशतीमुळे शिवारातील शेतीची कामे रखडली असून, बोरजवळा येथील मोहनसिंह तोमर, राजू इंगळे, गणेश इंगळे, रमेश मुर्हे, दीपक जाधव आदी शेतकर्यांनी िबबट्याला पाहीले असून, याबाबत वनविभागाकडे तक्रार केली आहे. शिवाय बोरजवळा शिवारात ठिकठिकाणी बिबट्याचे पगमार्क दिसून येत आहेत.
सामाजिक वनीकरण विभागाचे दुर्लक्ष
० िबबट्याच्या दहशतीबाबत संतप्त गावकर्यांकडून वनविभागाला माहिती देण्यात आली आहे. मात्र, वनविभागाकडून अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई केली नाही. वन विभागाचे अधिकारी फ ो नही उचलत नसल्याचा आरोप शेतकर्यांचा आहे.
मक्याची कापणी, मशागत रखडली
बिबट्याच्या दहशतीमुळे अनेक शेतकर्यांची गहू, मका कापणी रखडली आहे. त्याचवेळी शेतीची मशागतही रखडली आहे. त्यामुळे शेतकर्यांमध्ये वनविभागाच्या चालढकल वृत्तीबाबत संताप व्यक्त केल्या जात आहे.