बुलडाणा जिल्ह्यातील ७८० शेतकऱ्यांना बोंडअळी व्यवस्थापनाचे धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2019 02:48 PM2019-08-03T14:48:08+5:302019-08-03T14:48:17+5:30
मोफत चर्चासत्राचे आयोजन करून जिल्ह्यातील ३८ गावांमधील तब्बल ७८० शेतकऱ्यांना व्यवस्थापनाचे धडे देण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : कपाशी पिकावरील गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कृषी विभागाने पुढाकार घेतला आहे. यासाठी मोफत चर्चासत्राचे आयोजन करून जिल्ह्यातील ३८ गावांमधील तब्बल ७८० शेतकऱ्यांना व्यवस्थापनाचे धडे देण्यात आले.
अध्यक्षस्थानी कृषी विकास अधिकारी अनिसा महाबळे, कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ उमाळे, विकास जाधव, तालुका कृषी अधिकारी गणेश गिरी, मोहिम अधिकारी गवई, जिल्हा गुण नियंत्रण अधिकारी खर्चे, राहुल पांडे, सावेसकुमार, प्रशांत वाणी, महेश गायकवाड आदींची प्रमुख उपस्थिती होती. गुलाबी बोंडअळीच्या हल्ल्यापासून पिकांचे रक्षण कसे करावे या बद्दल तज्ज्ञांनी कपाशीवरील बोंडअळीच्या हल्ल्याच्या विविध टप्प्यांच्या व्यवस्थापनाची माहिती दिली. बोंड अळीचा हल्ला कसा ओळखायचा आणि रोखायचा. तसेच एकात्मिक किड नियंत्रण अधिक प्रभावीपणे कसे करायचे या बद्दल सविस्तर प्रशिक्षण यावेळी देण्यात आले.
डॉ. पंजाबराव कृषी विद्यापिठाच्या सहकायार्ने राज्यात अनेक ठिकाणी गुलाबी बोंडअळी आणि लष्करी अळी हल्ल्यापासून पिकाचे रक्षण करण्यासाठी कार्यशाळा आणि प्रकल्प आयोजित करण्यात आले आहेत. या प्रकल्पाचा भाग म्हणून डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ यांच्या वतीने खेडी दत्तक घेतली असून कपाशीवरील गुलाबी बोंडअळीच्या प्रभावी नियंत्रणाबद्दल शेतकºयांना प्रशिक्षण दिले आहे. या माध्यमातून शेतकºयांना बोंडअळीचा बंदोबस्त करण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्यासाठी मदत होणार आहे. या कार्यक्रमामध्ये शेतकºयांना विषबाधेपासून वाचविण्यासाठी ५०० सुरक्षा किट वाटप करण्यात आल्या. फवारणी करताना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहनही करण्यात आले.
(प्रतिनिधी)