कापूस बोनस प्रश्नावर मंत्रिमंडळात चर्चा करू - खोत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2017 01:40 AM2017-11-02T01:40:05+5:302017-11-02T01:40:16+5:30

बुलडाणा :  राज्यभरात कापूस पणन महासंघांतर्गत ६0 खरेदी केंद्र सुरू झाली असून, राज्यातील कापूस उत्पादकांना बोनस देण्याच्या मुद्यावर प्रथम मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा केली जाईल, अशी माहिती कृषी तथा फलोत्पादन आणि पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी बुधवारी लोकमतशी बोलताना दिली.

Let us talk about cotton bonuses in cabinet - Khot | कापूस बोनस प्रश्नावर मंत्रिमंडळात चर्चा करू - खोत

कापूस बोनस प्रश्नावर मंत्रिमंडळात चर्चा करू - खोत

Next
ठळक मुद्देसोयाबीनच्या भावासाठी पीक कापणी प्रयोगाचा आधार

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा :  राज्यभरात कापूस पणन महासंघांतर्गत ६0 खरेदी केंद्र सुरू झाली असून, राज्यातील कापूस उत्पादकांना बोनस देण्याच्या मुद्यावर प्रथम मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा केली जाईल, अशी माहिती कृषी तथा फलोत्पादन आणि पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी बुधवारी लोकमतशी बोलताना दिली. दरम्यान, सोयाबीनच्या भावासंदर्भात शेतकर्‍यांमधील रोष पाहता पीक कापणी प्रयोगातील अँव्हरेजचा आधार घेत भाव ठरवला जावा, असे आपण सुचित केले असल्याचे ते म्हणाले.
बुलडाणा बाजार समितीमध्ये मूग, उडीद सोयाबीन शासकीय हमी भाव खरेदी केंद्राच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी ते बुलडाण्यात आले होते. यावेळी त्यांनी पाणी पुरवठा, स्वच्छता आणि कृषी विभागातील अधिकार्‍यांची विश्रामगृहामध्ये बैठक घेतल्यानंतर ते बोलत होते.
दरम्यान, गुजरातमध्ये हमीदराच्यावर प्रतिक्विंटलला ५00 रुपयांचा बोनस जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्रात कापूस उत्पादक शेतकर्‍यांना असा काही बोनस जाहीर करण्याची शक्यता आहे का? याबाबत त्यांना विचारले असता मंत्रिमंडळाच्या आगामी बैठकीत संबंधित विषयावर चर्चा करण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल, असे ते म्हणाले. सोयाबीन शेतमालाची हेक्टरी १५ क्विंटल खरेदी करणात येणार असून, हमी भाव ३,0५0 रुपयाप्रमाणे खरेदी करण्यात येईल, असे त्यांनी बुलडाण्यातील बाजार समितीमधील कार्यक्रमादरम्यान सांगितले.
दुसरीकडे राज्यात कापूस पणन महासंघांतर्गत ६0 केंद्र सुरू झाले असून, बुलडाणा जिल्ह्यात जळगाव जामोद, देऊळगाव राजा आणि शेगाव येथे केंद्र सुरू झाले आहेत. यापैकी शेगाव वगळता अन्य केंद्रावर आतापर्यंत ५८  क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे. चार हजार ३२0 रुपयांचा भाव कापसाला सध्या दिला जात असल्याचे कापूस पणन महासंघाचे खामगाव येथील विभागीय व्यवस्थापक तोवर यांनी स्पष्ट केले.

Web Title: Let us talk about cotton bonuses in cabinet - Khot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती