अल्पसंख्यक आयोगाचे बुलडाणा जिल्हाधिका-यांना पत्र
By admin | Published: January 6, 2015 12:13 AM2015-01-06T00:13:11+5:302015-01-06T00:13:11+5:30
अमडापूर येथील तलाठय़ावर कारवाई; जिल्हाधिका-याची चौकशी.
बुलडाणा : गारपीटग्रस्तांना देण्यात आलेल्या मदतीच्या रकमेतून शंभर रुपयांची कपात केल्याचा आरोप प्रकरणी अल्पसंख्यक आयोगाने जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांना आयोगासमोर उपस्थित राहण्याचे पत्र दिले आहे. गारपीटग्रस्त शेतकर्यांना शासनाकडून दिलेल्या रकमेतून शंभर रुपयांची कपात करण्याच्या आरोपातून अमडापूर भाग तीनचे तलाठी रियाज शेख यांच्यावर पोलीस कारवाई करण्यात आली होती; मात्र नागपूर हायकोर्टाने तलाठी शेख यांना निर्दोष ठरविले. याप्रकरणी तक्रार तलाठी शेख यांनी महाराष्ट्र अल्पसंख्यक आयोगाकडे केली होती. या प्रकरणी पोलीस कारवाईच्या माहितीसह ६ जानेवारीला आयोगासमोर उपस्थित राहण्यासंदर्भात जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक यांना अल्पसंख्यक आयोगाने पत्र दिले आहे.