भारतीय डाक विभागाकडून पत्रलेखन स्पर्धेचे आयेाजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:34 AM2021-03-18T04:34:41+5:302021-03-18T04:34:41+5:30

बुलडाणा : भारतीय डाक विभागाने १५ वर्षापर्यंतच्या युवांसाठी आंतरराष्ट्रीय पत्र लेखन स्पर्धेचे आयेाजन केले आहे. ...

Letter writing competition organized by Indian Postal Department | भारतीय डाक विभागाकडून पत्रलेखन स्पर्धेचे आयेाजन

भारतीय डाक विभागाकडून पत्रलेखन स्पर्धेचे आयेाजन

Next

बुलडाणा : भारतीय डाक विभागाने १५ वर्षापर्यंतच्या युवांसाठी आंतरराष्ट्रीय पत्र लेखन स्पर्धेचे आयेाजन केले आहे. ही स्पर्धा ४ एप्रिल रोजी सकाळी ११ ते १२ या वेळेत आयोजित करण्यात येणार आहे. इच्छुक स्पर्धकांनी इंग्रजी, मराठी, हिंदी यापेकी कुठल्याही ण्का भाषेत पत्रलेखन लिहायचे आहे. सदर स्पर्धेसाठी राज्य स्तरावर प्रथम पारितोषिक २५ हजार रूपये, द्वितीय १० हजार रूपये व तृतीय पारितोषिक ५ हजार रूपये असणार आहे. तसेच प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. राष्ट्रीय स्तरावर प्रथम ५० हजार रूपये, द्वितीय २५ हजार रूपये व तृतीय १० हजार रूपये बक्षीस असणार आहे. याबाबतच्या अधिक माहितीसाठी जवळच्या डाक घरमध्ये संपर्क करावा असे आवाहन डाक अधिक्षक ए. के इंगळे यांनी केले आहे.

Web Title: Letter writing competition organized by Indian Postal Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.